🕒 1 min read
मुंबई : अनुभवी फलंदाज मुरली विजय एकेकाळी भारतीय संघाच्या फलंदाजीचा अविभाज्य भाग होता. मात्र सततच्या खराब कामगिरीमुळे तो सध्या भारतीय संघाबाहेर पडला आहे. परिस्थिती अशी आहे की भारतीय संघाबरोबरच त्याला आयपीएलमध्येही खरेदीदार मिळत नाहीयेत. सततच्या खराब कामगिरीमुळे तो देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करून संघात पुन्हा स्थान मिळवण्याचा प्रयत्न करत आहे.
नुकताच मुरली विजयचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर खूप वेगाने व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये त्याने तामिळनाडू प्रीमियर लीगमध्ये स्फोटक फलंदाजी करताना शतक झळकावले होते. या व्हिडिओनंतर विजयचा आणखी एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये विजय सीमारेषेजवळ क्षेत्ररक्षण करताना दिसत आहे. दरम्यान जवळच असलेले चाहते दिनेश कार्तिकचे नाव घेऊन त्याला चिडवत आहेत.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये, विजयला पाहून चाहते डीके..डीके ओरडत आहेत. त्यादरम्यान, तो हात जोडून आणि चाहत्यांना शांत राहण्यासाठी इशारा करताना दिसत आहे. तरीही चाहते थांबले नाहीत आणि त्यांच्यासमोर डीके..डीके ओरडत राहिले. मुरली विजय आणि दिनेश कार्तिक एकेकाळी जवळचे मित्र होते. मात्र, कार्तिकची पहिली पत्नी निकिता वंजारासोबतच्या अफेअरमुळे ही मैत्री तुटली. पुढे कार्तिक आणि निकिताच्या घटस्फोटानंतर विजयने निकितासोबत लग्न केले. याच कारणामुळे चाहत्यांना विजय कदाचित आवडला नसावा.
#TNPL2022 DK DK DK ……
Murali Vijay reaction pic.twitter.com/wK8ZJ84351— Muthu (@muthu_offl) July 7, 2022
सध्या दिनेश कार्तिक भारतीय संघासोबत वेस्ट इंडिज दौऱ्यावर आहे. एकदिवसीय मालिका संपल्यानंतर भारतीय संघ कॅरेबियन संघासोबत ५ सामन्यांच्या टी-२० मालिका खेळणार आहे. कार्तिकचा टी-२० मालिकेसाठी भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Eknath Shinde meet Ratan Tata | मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली रतन टाटा यांची सदिच्छा भेट
- Sandeep Deshpande : “हा पझेसिव्हनेस आहे की असुरक्षितता?”, मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका
- Uddhav Thackeray : बाळासाहेबांना दिलेले वचन अजूनही अपूर्ण!, उद्धव ठाकरे मुलाखतीत असे का म्हणाले?
- महाराष्ट्र सुपर मॉडेलचा महाअंतिम सोहळा संपन्न
- डिळी कादंबरीत गावखेडे आणि निमशहरी जगण्याची प्रगल्भ मांडणी – रंगनाथ पठारे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

