मुंबई : भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये एकदिवसीय मालिकेतील शेवटचा आणि निर्णायक सामना आज खेळला जात आहे. हा सामना मँचेस्टर येथे सुरू आहे. सामन्याच्या सुरुवातीला भारताचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. सामन्यात इंग्लंड संघाने प्रथम फलंदाजी करताना २५९ धावा केल्या आहेत. भारताला मालिकेत विजय मिळवण्यासाठी इंग्लंडने दिलेल्या लक्षाचा यशस्वी पाठलाग करावा लागेल. तसेच भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीच्या फलंदाजीवर चाहत्यांच्या नजरा असणार आहेत.
इंग्लंडचा डाव
सामन्याच्या सुरुवातीला नाणेफेकीचा कौल भारताच्या बाजूने आल्याने इंग्लंडला पहिल्यांदा फलंदाजी करावी लागली. इंग्लंडकडून सलामीवीर जेसन रॉय (४१ धावा), बेन स्टोक्स (२७ धावा), कर्णधार जोस बटलर (६० धावा ), मोईन अली (३४ धावा), लिया लिविंगस्टोन (२७ धावा) आणि क्रेग ओव्हरटन (३२ धावा) यांनी उपयुक्त खेळी खेळल्या. तर सलामीवीर जॉनी बेअरस्टो आणि जो रूट यांना खातेही उघडता आले नाही. दोघेही मोहम्मद सिराजच्या गोलंदाजीवर बाद झाले. भारताकडून हार्दिक पंड्याने उत्कृष्ट गोलंदाजी केली. त्याने २४ धावांत ४ गडी बाद केले. तर फिरकीपटू युझवेंद्र चहलने ३ गडी बाद केले. मोहम्मद सिराजला दोन गडी बाद करण्यात यश आले. रवींद्र जडेजाने एक गडी बाद केला.
जसप्रीत बुमराहच्या पाठीत वेदाना होत असल्यामुळे तो या सामन्यात खेळणार नसल्याचे रोहितने सांगितले. शिवाय भविष्याच्या दृष्टीने बुमराहसाठी आराम गरजेचा आहे, याच कारणास्तव त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये सहभागी केले गेले नाही, असे रोहितने स्पष्ट केले. याशिवाय आशिया चषकाअगोदर भारतीय संघ वेस्टइंडीज दौऱ्यावर जाणार आहे. यामध्येही जसप्रीत बुमराहला आराम देण्यात आला आहे. त्यामुळे बुमराह आता थेट आशिया चषकात टीम इंडियात खेळताना दिसेल. शिवाय भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीलाही वेस्टइंडीज दौऱ्यातून आराम देण्यात आला आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Sandipanrao Bhumre | एकनाथ शिंदेंसमोर संदीपान भुमरे म्हणाले… ” मी मुख्यमंत्री झालो”
- Sharad Pawar | शरद पवारांनी जाहीर केला उपराष्ट्रपती पदाचा उमेदवार
- Flood | नाल्याच्या पुरात बैलगाडी वाहून गेल्याचे थरारक दृश्य कॅमेऱ्यात कैद
- SL vs PAK : सामना सुरू असताना ‘या’ पाकिस्तानी बॉलरने केला डान्स; VIDEO तुम्ही पाहिला का?
- Fish । बीडमधील केजडी नदीला माशांचा महापूर; मासे पहायला स्थानिकांची गर्दी


