🕒 1 min read
दिल्ली: उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी युपीएच्या वतीने अधिकृत उमेदवार जाहीर करण्यात आला आहे. उपराष्ट्रपती पदाच्या उमेदवार म्हणून मार्गारेट अल्वा यांची घोषणा करण्यात आली आहे. आज झालेल्या सर्व विरोधी पक्षांच्या बैठकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत मार्गारेट अल्वा यांच्या नावाची घोषणा केली आहे.
आज शरद पवार यांच्या दिल्लीतील घरी विरोधी पक्षांची बैठक झाली. काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे, सीपीएमचे सीताराम येचुरी, शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यासह अनेक नेते या बैठकीत सहभागी झाले होते. याच बैठकीत उपराष्ट्रपती पदासाठी युपीएच्या उमेदवार म्हणून काँग्रेस नेत्या मार्गारेट अल्वा यांच्या नावावर एकमत झाले. मार्गारेट अल्वा या गोव्याच्या राज्यपाल होत्या. तर या दरम्यान, एनडीएने पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखड यांना उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवार म्हणून घोषित केले आहे. शनिवारी सायंकाळी त्यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली होती.
कधी होणार निवडणुका
उपराष्ट्रपती पदासाठी येत्या ६ ऑगस्टला निवडणूक होणार आहे. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या माहितीनुसार, 19 जुलै ही उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. तर विद्यमान उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांचा कार्यकाळ 10 ऑगस्ट 2022 रोजी संपणार आहे.
महत्वाच्या बातम्या:
- Flood | नाल्याच्या पुरात बैलगाडी वाहून गेल्याचे थरारक दृश्य कॅमेऱ्यात कैद
- SL vs PAK : सामना सुरू असताना ‘या’ पाकिस्तानी बॉलरने केला डान्स; VIDEO तुम्ही पाहिला का?
- Fish । बीडमधील केजडी नदीला माशांचा महापूर; मासे पहायला स्थानिकांची गर्दी
- KL Rahul : केएल राहुल वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी करतोय कसून सराव; पाहा ‘हा’ VIDEO!
- Cobra snake | कोब्रा नाग अडकला मच्छिमाऱ्यांच्या जाळ्यात
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
