Share

Flood | नाल्याच्या पुरात बैलगाडी वाहून गेल्याचे थरारक दृश्य कॅमेऱ्यात कैद

Published On: 

🕒 1 min read

महाराष्ट्र देशा डेस्क : नाल्याच्या पुरात बैलगाडी वाहून गेल्याचे थरारक दृश्य कॅमेऱ्यात कैद झाले आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना तालुक्यातल्या नांदा येथील नाल्याला महापूर आला आहे. गेले 10 दिवस हा नाला पुराच्या पाण्याने भरून वाहत आहे. अशा परिस्थितीत सुद्धा पुलाच्या पलीकडे असलेल्या सात ते आठ गावांना हा नाला पार करून शेतशिवारात जावे लागते. याच पुराच्या पाण्यात एक बैलगाडी वाहून गेल्याची घटना घडली आहे.

गेली 15 वर्षे या नाल्यावर पूल बांधण्याची ग्रामस्थांची मागणी सरकार दरबारी रखडली आहे. हाच रस्ता पुढे कोरपना- आदिलाबाद राष्ट्रीय महामार्गाला जोडला जातो. मात्र यामार्गे असलेला बारमाही नाला हा विकासात अडसर ठरला आहे. अशातच शेतीच्या अत्यावश्यक कामासाठी बैलगाडी घेऊन गेलेले दोघे जण पुरातून वाट काढत होते. मात्र प्रचंड प्रवाहामुळे हि बैलगाडी वाहून गेली. नदीच्या काठावर असलेल्या ग्रामस्थांनी धावाधाव करत मदत केल्याने बैलजोडी व गाडीतील दोघांचे प्राण वाचले. गहिनीनाथ वराटे असे या वाचलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवातही साध्या साध्या दळणवळणाच्या समस्यांकडे प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याचे चित्र यानिमित्ताने समोर आले आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!