Share

CWG 2022 : कॉमनवेल्थ गेम्स २०२२ पूर्वी भारताला मोठा धक्का, खेळाडू डोप चाचणीत फेल!

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : बर्मिंगहॅम कॉमनवेल्थ गेम्स २०२२ (CWG 2022) पूर्वी भारताला एक मोठा धक्का बसला आहे. स्टार महिला धावपटू एस धनलक्ष्मी डोप चाचणीत पॉझिटिव्ह आढळली आहे. अशा स्थितीत धनलक्ष्मी यापुढे राष्ट्रकुल स्पर्धेत सहभागी होऊ शकणार नाही. या भारतीय महिला खेळाडूवर तात्पुरती बंदी घालण्यात आली आहे. २४ वर्षीय धनलक्ष्मी नुकतीच दुती चंद आणि हिमा दास यांना पराभूत केल्याने चर्चेत राहिला होती.

तामिळनाडूची रहिवासी असलेल्या धनलक्ष्मीने गेल्या वर्षी १०० मीटर शर्यतीत दिग्गज महिला धावपटू दुतीचंद, तर २०० मीटर शर्यतीत हिमा दास हिला पराभूत करून खूप प्रशंसा मिळवली होती. जागतिक अॅथलेटिक्सच्या अॅथलीट इंटिग्रिटी युनिटने (AIU) केलेल्या चाचणीत धनलक्ष्मी फेल झाली आहे. धनलक्ष्मीचा नमुना देशाबाहेरील एआययूने स्पर्धेच्या नमुन्यातून घेतला होता.

धनलक्ष्मीच्या नमुन्यात अॅनाबॉलिक स्टिरॉइड आढळले

धनलक्ष्मीच्या नमुन्यात अॅनाबॉलिक स्टिरॉइड आढळले आहे. डोप चाचणीत अपयशी ठरल्याने धनलक्ष्मीला अमेरिकेतील यूजीन येथे सुरू असलेल्या जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्येही सहभागी होण्यापासून रोखण्यात आले आहे. भारताकडून धनलक्ष्मी २०२२ च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत १०० मीटर आणि रिले स्पर्धेत भाग घेणार होती.

पंतप्रधानांनी खेळाडूंना दिले प्रोत्साहन

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताचे २१५ खेळाडू सहभागी होणार आहेत. भारताला सीडब्ल्यूजी मध्ये भालाफेकपटू नीरज चोप्रा, शटलर पीव्ही सिंधू, वेटलिफ्टर मीराबाई चानू, कुस्तीपटू बजरंग पुनिया, बॉक्सर अमित पंघल आणि टेबल टेनिसमध्ये मनिका बत्रा यांच्याकडून सुवर्णपदकांची अपेक्षा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे खेळाडूंशी संपर्क साधला आणि त्यांना राष्ट्रकुल स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!