🕒 1 min read
नवी दिल्ली : ऑस्ट्रेलिया संघ तब्बल २४ वर्षांनी पाकिस्तान दौऱ्यावर गेला आहे. दोन्ही संघात रावळपिंडी येथे झालेला पहिला कसोटी सामना अनिर्णीत राहिला. रावळपिंडी कसोटीत दोन्ही संघांनी १ हजारहून अधिक धावा केल्या होत्या. त्यावरून पाकिस्तान क्रिकेट बोर्डावर टीका देखील झाली होती. त्यातच आता ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेटपटूंना दिल्या जाणाऱ्या जेवणावरून वाद निर्माण झाला आहे.
पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात दुसरा कसोटी सामना कराची येथे सुरू आहे. या कसोटी आधी ऑस्ट्रेलिया संघाच्या लंच मेन्यूमध्ये दाळ-रोटीचा समावेश केला आहे. ऑस्ट्रेलियाचा फलंदाज मार्नास लाबुशेनयाने सोशल मीडियावर दाळ-रोटीचा फोटो शेअर करत म्हटले आहे की, लंचसाठी दाळ-रोटी किती चविष्ट आहे. लाबुशेनने हा फोटो सोशल मीडियावर शेअर करताच पाकिस्तान क्रिकेट बोर्डला ट्रोल केले जाऊ लागले.
भारताचा माजी सलामीवीर वसीम जाफर याने देखील लाबुशेनच्या पोस्टवर एक मजेदार प्रतिक्रिया दिली आहे. जाफर याने लाबुशनेला त्याच्या प्रतिक्रियेद्वारे म्हणाला की, दाळ-रोटी किती फायद्याची आहे. अन्य एका युझरने लाबुशेनच्या पोस्टवर म्हणले की, यापुढे कधीच मेसमधील जेवणावर टीका करणार नाही.
पहिल्या कसोटीत दोन्ही संघांनी मिळून १ हजार १८७ धावा केल्या होत्या आणि फक्त १४ विकेट पडल्या. या सामन्यासाठी खेळपट्टी फलंदाजीचा विचार करून तयार करण्यात आली होती. सामना झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिंन्सने टीका केली होती.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
