Share

Narendra Modi | बँकांचे खासगीकरण मोदी सरकार यांच्या अंगलट ; RBI ने दिला गंभीर इशारा!

Published On: 

मुंबई :  सध्या देशामध्ये अनेक क्षेत्रांमधील कामकाज जोरदार सुरू असल्याचं पाहायला मिळतं आहे. तसेच मोदी सरकार यांनी काही दिवसांपूर्वी सार्वजनिक बॅंकाचे खासगीकरण  केले होते. या संदर्भात रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजेच RBI ने  एक मोठं वक्तव्य केलं आहे.

सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे मोठ्या प्रमाणावर खासगीकरण केले तर त्यामध्ये फायद्यापेक्षा अधिक नुकसानच होण्याचा धोका असल्याचं बोललं आहे. त्याचबरोबर केंद्र सरकारने या प्रकरणात यापुढे सावधानगिरीने पाऊलं टाकावीत, असा इशाराही रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने मोदी सरकारला दिला असल्याचं समजतं आहे.

खासगीकरणाचे फायदे आणि तोटे सर्वांना माहीत आहेत-

खासगी क्षेत्रातील बँका (पीव्हीबी) नफा वाढविण्यात अधिक कार्यक्षम आहेत. तर सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी आर्थिक समावेशनाला म्हणजेच देशातील सर्व नागरिकांना सुविधा देण्याच्या कामाला चालना देण्यात उत्तम कामगिरी केली असल्याचं रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने त्यांच्या एका लेखामध्ये म्हटलं होतं. तसेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सांगितले की, खासगीकरण ही नवीन संकल्पना नाही. त्यामुळे खासगीकरणाचे फायदे आणि तोटे सर्वांना माहीत आहेत. तसेच खासगीकरण हा पारंपरिकपणे सर्व समस्यांवर मुख्य उपाय असला, तरी आर्थिक विचारातून पुढे जाण्यासाठी सर्तकतेचा दृष्टिकोन आवश्यक आहे.

10 सरकारी बँकांचे चार मोठ्या बँकांमध्ये विलीनीकरण-

दरम्यान, 2022 मध्ये केंद्र सरकारने 10 सरकारी बँकांचे चार मोठ्या बँकांमध्ये विलीनीकरण केले. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांची संख्या आता 12 वर आली आहे. जी 2017 मध्ये 27 इतकी होती.

 

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!