Share

Uddhav Thackeray | बहुमत असुनही मोदी सरकार शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना घाबरते- शिवसेना

Published On: 

🕒 1 min read

मुंबई :  एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत युती करून सरकार स्थापन केलं आहे. तेव्हापासून सत्ताधारी आणि महाविकास आघाडी सरकारमध्ये चांगली टोलेबाजी सुरू असते. तसेच सध्या ‘ईडी’सारख्या केंद्रीय तपास यंत्रणांकडून अनेक नेत्यांवर कारवाई सुरू आहे. याच पार्श्वभूमिवर शिवसेना पक्षाने पुन्हा एकदा मोदी सरकारवर हल्ला केला आहे. मोदी सरकार उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना घाबरते.

बहुमत असुनही मोदी सरकार आम्हाला घाबरते-

मोदी सरकारला बहुमत असुनही मोदी सरकार शिवेसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना घाबरत असल्याचं शिवसेना पक्षाचे मुखपत्र असलेल्या सामनामध्ये म्हटलं गेलं आहे.

विष्णुचे आवडते फूल ‘कमळ’ बदनाम-

सरकारे निवडून आणण्यापेक्षा विरोधकांची सरकारे पाडणे, पक्ष फोडणे, असे जे काही सुरु आहे. त्यामुळे विष्णुचे आवडते फूल असलेले ‘कमळ’ बदनाम झाले आहे, असं म्हणत शिवसेनेने मोदी सरकारला चांगलंच फटकारलं असल्याचंं दिसून येतं आहे. तसेच ऑपरेशन लोटस म्हणजे ‘कमळ’ हा अलकायदाप्रमाणे दहशतीचा शब्द बनला असल्याचंही त्यामध्ये म्हटलं आहे.

शिवसेना पक्षाच्या सामनामधुन सरकारवर हल्ला-

तसेच, या सरकारला भय वाटते कारण हे बहुमत निखळ नाही. ते चोरलेले आहे. धाडसत्र आणि सूडाची छापेमारी ही त्यांचे शस्त्रे आहेत. त्याच शस्त्रांनी त्यांचे ‘ऑपरेशन कमळ’ होते, पण कमळाच्या लाभार्थ्यांवर सरकारी छाप्यांचे वार होत नसल्याचंही शिवसेनेने म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!