🕒 1 min read
मुंबई : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी एका मुलाखतीमध्ये टोल प्लाझा हटवण्याचा विचार चालला असल्याचं सांगितलं आहे. मोदी सरकार लवकरच हा निर्णय घेणार असून आता वाहन चालकांना टोल वर थांबण्याची गरज भासणार नाही.
नितीन गडकरी यांनी सांगितली योजनाः
2019 मध्ये सर्व गाड्यांवर कंपनीच्या नंबर प्लेट असतील असा नियम सरकारने केला होता. त्यानंतर आता टोल प्लाझा काढून कॅमेरा लावण्याची योजना आहे. सर्व गाड्यांवर कंपीनीच्या नंबर प्लेट्स असतील आणि टोल थेट चालकाच्या खात्यातून कापला जाईल, असी ही योजना आहे.
टोल प्लाझा हटवून कॅमेरा बसवणारः
कॅमेरे वाहनांचे नंबर प्लेट्स वाचतील आणि वाहन मालकांच्या बँक खात्यातून टोल शुल्क कापला जाईल. टोल नाक्यांवरील प्रवेश आणि बाहेर जाण्यासाठी हे कॅमेरे बसवले जातात. या कॅमेर्या द्वारे सर्व नंबर प्लेट्स वाचता येतील का हा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. त्यावर 2019 नंतर आलेल्या नंबर प्लेट्सचीच या कॅमेरा द्वारे नोंदणी केली जाईल. तसेच गडकरींनी सांगितल्याप्रमाणे केंद्राने वाहनांना कंपनी फिट नंबर प्लेट लावणं अनिवार्य करणारा नियम बनवला होता. या प्रक्रिया जुना नंबर प्लेट बदलण्यासाठी सरकारची योजना आहे असं त्यांनी अहवालात म्हटलं आहे.
दरम्यान, गडकरी यांनी या योजनेचा एक टप्पा चालू आहे आणि ही योजना सुलभ करण्यासाठी कायदेशीर सुधारणा देखील केल्या जातील आणि जे टोल भरत नाहीत अशा चालकांना या योजनेमुळे चाप बसेल, असं देखील नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्याः
- Ajit Pawar | पूर्वी तुम्ही डान्स बार फोडलेत, आता तुमच्या घराजवळच सुरू- अजित पवार
- Jayant Patil। “शिरसाट यांचं काय होणार? एक टोपी घेतली, दुसरीवर अन्याय का?” जयंत पाटलांची टोलेबाजी
- Udhhav Thackeray | भाजप राष्ट्रीय पक्ष आहे की चोरबाजार?- उद्धव ठाकरे
- Shivsena । “अनिल पाटलांच्या गळ्यातील हार हिसकावून घेण्याचा शिंदे गटाने प्रयत्न केला, त्यावरून…”; शिवसेनेचं स्पष्टीकरण
- Atul Bhatkhalkar | तुमच्यावर बलात्काराचे आरोप झाले आणि त्याची चौकशीच झाली नाही-अतुल भातखळकर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
