🕒 1 min read
मुंबई : राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांच्या काही मागण्या मान्य करुनही ते संप (ST strike) मागे घेण्यास तयार नाहीत. त्यामुळे या कर्मचाऱ्यांवर मेस्मा कायद्यातंर्गत कारवाई करण्याचा इशारा परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिला होता. आता यावर आज होणाऱ्या राज्य मंत्रीमंडळ बैठकीत निर्णय होण्याची शक्यता आहे.
राज्य सरकारने वारंवार आवाहन करूनही एसटी संपावर ठाम आहेत. आता यावर राज्य सरकार कठोर निर्णय घेण्याची चिन्हे दिसून येत आहेत. परिवहन मंत्री अनिल परब यांनी मागील आठवड्यात कामावर हजर नाही राहिलात तर मेस्मा अंतर्गत कारवाई करण्याचा सरकारचा विचार असल्याचे सांगितले होते. याचमुळे आजच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आंदोलनकर्त्या एसटी कर्मचाऱ्यांवर मेस्मा अंतर्गत कारवाई करावी का? यावर चर्चा होण्याची शक्यता आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत परिवहन मंत्री आज कॅबिनेटमध्ये सविस्तर चर्चा करणार असल्याची माहिती आहे. आंदोलनकर्त्या एसटी कर्मचाऱ्यांवर मेस्मा अंतर्गत कारवाई करण्याची परिवहन विभागाची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाली असून, आता राज्य मंत्रिमंडळ बैठकी नंतरच मेस्मा बाबतचा निर्णय होऊ शकतो. त्यामुळे आजच्या बैठकीत मेस्मा अंतर्गत कारवाईचा निर्णय घेतला जाणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. दरम्यान आतापर्यंत ९९१० कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले असून, २०१४ कर्मचाऱ्याची सेवा समाप्ती केलेली आहे.
मेस्मा म्हणजे काय?
महाराष्ट्र अत्यावश्यक सेवा परिरक्षण अधिनियम २०११ म्हणजे मेस्मा. रुग्णालये व दवाखाने यांच्यासह सार्वजनिक आरोग्य, एसटी महामंडळ, स्वच्छता राखण्याच्या संबंधातील सेवा अत्यावश्यक आहेत. किरकोळ व घाऊक औषधविक्री सेवा ही अत्यावश्यक सेवा आहे. उपरोक्त कायद्यानुसार लोकहित ध्यानात घेऊन संपास मनाई करण्यात येते. आदेश झुगारणार्यांवर कारवाई होते. प्रामुख्याने रुग्णालये व दवाखाने यांच्यासह सार्वजनिक आरोग्य व स्वच्छता राखण्याच्या संबंधातील सेवा अत्यावश्यक आहेत.
महत्वाच्या बातम्या
- राजकारण करण्यासाठी ओबीसी आरक्षणाचे लचके तोडत आहेत; संभाजी ब्रिगेडचा आक्रमक प्रतिक्रिया
- ‘नागालँड प्रकरणाची ‘कोर्ट ऑफ इन्क्वायरी’ कधी होणार?’, खा. राऊतांचा सवाल
- ‘गुप्तचर यंत्रणेच्या चुकीच्या माहितीमुळेच नागालँडमधील अमानुष प्रकार घडला’
- ईडी चौकशीनंतर राज्यमंत्री तनपुरेंची प्रतिक्रिया; म्हणाले..
- ठाकरे सरकार अडचणीत; राज्यमंत्री प्राजक्त तनपुरेंची ईडीकडून चौकशी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
