🕒 1 min read
मुंबई: महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील (Maharashtra State Cooperative Bank) साखर कारखान्यांच्या घोटाळा प्रकरणात राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे (Prajakt Tanpure) यांची ईडीकडून तब्बल 9 तास चौकशी करण्यात आली आहे. दुपारी 3 वाजता ईडी कार्यालयात तनपुरे यांच्या चौकशीला सुरुवात झाली होती. त्यानंतर रात्री 10 च्या सुमारास ते ईडी कार्यालयातून बाहेर पडले. त्यामुळे ठाकरे सरकारमधील अजून एक मंत्री आता ईडीच्या रडारवर आहे. आता या चौकशीनंतर तनपुरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
यावेळी तनपुरे यांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. ईडी अधिकाऱ्यांच्या सर्व प्रश्नांना मी समाधानकारक उत्तरं दिली आहेत. तसंच पुढे त्यांनी बोलावल्यास आपण चौकशीला जाऊ, असंही तनपुरे म्हणाले आहेत. मला आज दुपारी एक वाजण्याच्या सुमारास ईडीने चौकशीला बोलावलेलं होतं. मात्र ईडीचे अधिकारी एका बैठकीत व्यस्त होते. त्यामुळे तीन वाजल्यापासून चौकशीला सुरुवात झाली. मी ईडीला सविस्तर उत्तर दिलेली आहेत. मला जे जे प्रश्न विचारण्यात आले त्यांची मी त्यांना उत्तर दिलेली आहेत. जे आक्षेप नोंदवले जात आहेत त्यात काहीही तथ्य नाही. काही तांत्रिक माहिती जी मी पाठ करु शकत नाही ती मला पुन्हा बोलावल्यास मी ईडीच्या अधिकाऱ्यांना देईन, असं तनपुरे यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले आहे.
दरम्यान राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे हे अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी मतदार संघाचे आमदार आहेत.अहमदनगर जिल्ह्यात राम गणेश गडकरी सहकारी साखर कारखाना होता. हा कारखाना तोट्यात निघाल्यावर महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने जप्त केला. यानंतर २०१२मध्ये या कारखान्याचा लिलाव जाहीर करण्यात आला. हा लिलाव जाहीर झाला तेव्हा प्राजक्त तनपुरे यांचे वडील माजी खासदार प्रसाद तनपुरे हे बँकेच्या संचालक मंडळावर होते. कारखान्याचा लिलाव जाहीर केला तेव्हा कारखान्याची विक्री किंमत २६ कोटी जाहीर करण्यात आली होती. मात्र, तनपुरे यांच्या प्रसाद शुगर अँड अलाईड या कंपनीने तो केवळ १३ कोटी रुपयांना विकत घेतला. दरम्यान याच व्यवहारप्रकरणी ईडीकडून त्यांची चौकशी करण्यात आली आहे.
महत्वाच्या बातम्या
- राजकारण करण्यासाठी ओबीसी आरक्षणाचे लचके तोडत आहेत; संभाजी ब्रिगेडचा आक्रमक प्रतिक्रिया
- ‘नागालँड प्रकरणाची ‘कोर्ट ऑफ इन्क्वायरी’ कधी होणार?’, खा. राऊतांचा सवाल
- ‘गुप्तचर यंत्रणेच्या चुकीच्या माहितीमुळेच नागालँडमधील अमानुष प्रकार घडला’
- संयुक्त किसान मोर्चाची आज महत्वाची बैठक; आंदोलन मागे घेण्याची शक्यता
- रजिस्टर लग्न करत जितेंद्र आव्हाडांच्या मुलीने सर्वांपुढेच ठेवला एक चांगला आदर्श
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
