कोल्हापूर: आज भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील कोल्हापुरात आले होते, यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सत्ताधाऱ्यांवर आणि इतर पक्षांवर निशाणा साधला. “आम्ही भ्रष्टाचाराचे कर्दनकाळ आहोत. आमची एवढी भीती निर्माण झाली आहे की सर्वजण एकमेकांचा हात घट्टपणे धरण्याचा प्रयत्न करणार आहेत. पण हात धरल्यानंतरही अपयश मिळतं हे कळल्यावर त्यांच्यात फाटाफूट होईल” असं वक्तव्य त्यांनी महाविकास आघाडी आणि सरकारला पाठिंबा देणाऱ्या पक्षांबद्दल केले.
तसेच पुढे ते असही म्हणाले कि, “शिवसेना मुख्यमंत्री पदाच्या खुर्ची साठी काहीही करु शकते. त्यामुळे येत्या निवडणुकीत फाटाफूट होऊ शकते. त्यामुळे आम्ही आणि आमचे सहयोगी पक्ष आम्ही महाविकास आघाडीला टक्कर देण्यास समर्थ आहोत”. भाजप चोख कारभार करते. एमआयएम देखील महाविकास आघाडी बरोबर जाणार अशी चर्चा सुरु आहे. त्यावर पाटील म्हणाले, भाजपचा कारभार पारदर्शक असतो. आम्ही भ्रष्टाचार होऊ देत नाही. चुकीच्या गोष्टींवर अंकूश ठेवतो. त्यामुळे भाजप सोडून कोणीही आलं तरी चालेल अशी सगळ्यांची भूमिका आहे. परंतु आगामी काळात आम्ही सहयोगी पक्षांनासोबत घेऊन एकटे लढायला तयार आहोत. तसेच एसटी महामंडळाबाबत सरकार जो पर्यंत काही ठोस म्हणणं सभागृहात मांडणार नाही, तोपर्यन्त आम्ही सभागृह चालूच देणार नाही, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
महत्वाच्या बातम्या:
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

