🕒 1 min read
मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांना आपण चर्चा करून विषय सोडवू असे परिवहन मंत्री अनिल परब मीडियाशी बोलताना सांगितले आहे. अनिल परब यांच्या म्हणण्यानुसार एसटी कर्मचाऱ्यांना लोक भडकावत आहेत. लोकांचे एकूण भूलथापांना बळी पडू नका १० मार्चच्या आत कामावर या अन्यथा भरपूर पर्याय खुले आहेत असे अनिल परब यांनी माध्यमाशी बोलताना सांगितले.
त्रीसदस्यीय अहवालात स्पष्ट केले आहे की राज्य सरकारमध्ये एसटी महामंडळाचे विलीनीकरण करणे शक्य नाही. यानंतर हा अहवाल अनिल परब यांनी विधानसभेच्या पटलावर ठेवला. व आज दुपारी माध्यमाच्या आधारे एसटी कर्मचाऱ्यांशी संवाद साधून कामावर परत यावे, आपली सेवा सुरु करावी असे आवाहन केले आहे.
सध्या ५२ हजार एसटी कर्मचारी कामावर नाहीत यातील ३० हजार कर्मचाऱ्यांवर कारवाई केली आहे, यातील काहींना निलंबन केले आहे तर काहींना बडतर्फी केले तर काहींना बडतर्फीची नोटीस पाठविली. यांची रोजी-रोटी जावू नये १० मार्चच्या आत कामावर यावे, कारवाई मागे घेण्यात येईल असेही सांगितले. सध्या १२ वी च्या परीक्षा चालू आहेत, लोकांच्या भूलथापांना बळी पडू नका. कामावर या अन्यथा आम्हाला वेगळा विचार करावा लागेल. असा इशाराही दिला आहे.
महत्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
