🕒 1 min read
पटना बिहार : बिहारच्या राजकारणात आता खळबळजनक घडामोडी होण्याच्या शक्यता वर्तवण्यात येत आहेत. सध्या बिहारमध्ये मोठ्या राजकीय हालचालींना वेग आले आहे. एकीकडे लालू प्रसाद यादव, तेजस्वी यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाने भाजपा आणि केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार संघर्ष करत आहे. तर आता दुसरीकडे भाजपासोबत युतीत सरकार स्थापन करून मुख्यमंत्रीपदावर असलेले नीतिश कुमार यांनी आपल्या आमदारांना महत्त्वापूर्ण सूचना दिललेल्या आहेत.
यामुळे आता बिहारच्या राजकारणात बदल होणार का असा प्रश्न उपस्थित झाला आहे. नितीशकुमार यांच्या सरकारला धोका असल्याचे चिन्ह दिसत आहेत. बिहारच्या राजकारणात उलथापालट होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पुढचे ७२ तास अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहेत. मुख्यमंत्री नितीश कुमार आपल्या आमदारांशी सतत संपर्कात असून त्यांच्याशी चर्चा करत आहेत. राज्यात भाजपासोबत ते सत्तेवर आहेत, मुख्यमंत्री आहेत, असे असतानाही त्यांनी पुढचे ७२ तास आपल्या सर्व नेते आणि आमदारांना पटनामधून बाहेर पडण्यास सक्त मनाई केली आहे.
नितीश कुमार यांच्या या निर्णयामुळे बिहारच्या राजकारणात सत्तासमिकरणात बदल होणार का? नितीश कुमार आता भाजपापासून फारकत घेण्याच्या विचारात आहेत का? नितीश कुमार आता भाजपापासून वेगळं होत स्वबळावर सत्ता स्थापन करण्याच्या विचारात आहेत का? असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. पण या सर्व प्रश्नांची उत्तरे आता ७२ तासांनंतरच मिळणार आहेत, अशी शक्यता आहे.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
