Share

बॉलिवूड विरुद्ध साऊथ वादावर करण जोहरचं स्पष्ट मत, म्हणाला…

Published On: 

🕒 1 min read

मुंबई :  मागच्या काही दिवसांपासून बॉलिवूड विरुद्ध साऊथ हा वाद चालू आहे. या वादावर आता करण जोहरने देखील स्पष्ट मत व्यक्त केल आहे. करणचा ‘जुग जुग जियो’ हा चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. या चित्रपटामध्ये कियारा अडवाणी आणि कार्तिक आर्यन यांची मुख्य भूमिका आहे. करणने या चित्रपटाच्या ट्रेलर लॉंचच्या वेळी बॉलिवूड आणि साऊथ चित्रपटच्या वादावर स्वतःचं मत मांडल.

करण म्हणाला की, ‘हिंदी चित्रपटांमध्ये आणि साऊथ चित्रपटांमध्ये कोणत्याच प्रकारची स्पर्धा नाही. ‘बाहुबली’ चित्रपटाची ज्यांनी निर्मिती केली त्या निर्मितीमध्ये माझा देखील सहभाग होता. त्यावेळी मी भाषा नाही तर चित्रपटाची ताकद पहिली आणि त्यावर विश्वास ठेवला. त्यामुळे कोणत्याच प्रकारची स्पर्धा नाही, आपल्याला एकत्र पुढे जायचं आहे.

जुग जुग जियो या चित्रपट ट्रेलरच्या वेळी करणने हिंदी चित्रपटाचा ट्रेलर या शब्दावर जास्त भर दिला. याबद्दल देखील त्याला विचारण्यात आले. त्यावेळी तो म्हणाला, “आरआरआर, पुष्पा, केजीएफ’ हे चित्रपट हिंदीतसुद्धा डब झाले आहेत. त्यांनी देखील बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. मागच्या काही दिवसांमध्ये प्रदर्शित झालेला गंगुबाई या चित्रपटाने देखील बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे”. अशा स्पष्ट शब्दांमध्ये करण जोहरने आपल मत मांडले.

महत्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!