Kishori Pednekar | मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून राज्याच्या राजकारणात अनेक मोठ्या घडामोडी घडत आहेत. राज्यातील महाविकास आघाडी सरकार जाऊन राज्यात नवं शिंदे सरकार अस्तित्वात आलं. यावेळी शिवसेना पक्षाचे ४० आमदार आणि १२ खासदार यांनी उद्धव ठाकरे सोडून एकनाथ शिंदे यांना समर्थन दिल. असा वेळी शिवसेना पक्ष पुर्णपणे विस्कळीत झाला आहे. त्यात भाजप, शिंदे गट यांच्यासोबतच मनसेने देखील शिवसेनेला टार्गेट करण्यास सुरवात केली आहे. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ट्विट करत शिवसेनेवर निशाणा साधला होता. यानंतर देशपांडे यांच्या ट्विटला शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर यांनी प्रत्युत्तर दिल आहे.
ज्या प्रकारे युती आघाडी प्रमाणे हे अनैसर्गिक वाक्य आहे राजा का बेटा नाही बनणार तर काय शेजारीचा बेटा बनेल तुम्ही देखिल तुमच्या मुलाला पुढे करता, यांचे वासे पहिल्यांदा फिरले, त्यामुळे घर फिरले, असं म्हणत किशोरी पेडणेकर यांनी देशपांडे यांना चांगलेच फटकारून काढले. ‘ज्या प्रकारे युती आघाडी झाली आहे, त्याप्रमाणे हे अनैसर्गिक वाक्य आहे. शिवसैनिक याला उत्तर देतील. काळा प्रमाणे याचे उत्तर मिळेल. आता लोहचुंबक होत राहणार आहे. चंद्रकांत पाटील बोलले की, काळजावर दगड ठेवून मुख्यमंत्री बनवलं आता कळेल कुठले दगड घेतले, असा टोलाही पेडणेकर यांनी लगावला.
ट्विट मध्ये नेमकं काय म्हणाले होते संदीप देशपांडे ?
संदीप देशपांडे हे सतत शिवसेनेवर टीका करत असतात. ते टीकेची एकही संधी सोडत नाहीत. आपल्या ट्वीटमध्ये संदीप देशपांडे म्हणतात, ‘अब राजा का बेटा राजा नही बनेगा राजा वही बनेगा जो हकदार होगा!’ यासोबत संदीप देशपांडेंनी राज ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरेंचा एक फोटोही शेअर केलाय. महाराष्ट्रात गेल्या महिन्याभरात घडलेल्या राजकीय भूकंपानंतर राज ठाकरे यांच्या फोटोसह संदीप देशपांडे यांनी केलेल्या या ट्वीटचे अनेक अर्थ आता राजकीय जाणकारांकडून काढले जात आहेत.
महत्वाच्या बातम्या :
- Yashomati Thakur | क्वालिटीचं काम नाही झालं तर डोकं फोडेल – यशोमती ठाकूर
- Arjun khotkar | “मी शिवसेना प्रमुखांशी एकनिष्ठ”; अर्जुन खोतकरांनी लावला शिंदे गटात गेल्याच्या चर्चांना ब्रेक
- Nana Patole : “हे रात्रीचं जेवण दिल्लीत आणि दुपारचं मुंबईत करतात”, नाना पटोलेंचा शिंदे-फडणवीसांना टोला
- Manisha Kayande : महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा अपमान होत असेल तर तो महाराष्ट्राचा अपमान आहे – मनीषा कायंदे
- Ajit Pawar | राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा; अजित पवार यांची मागणी


