🕒 1 min read
मुंबई : शिवसेनेत बंड पुकारल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी सहकारी आमदारांना सोबत घेऊन भाजपशी हात मिळवला आणि राज्यात सत्ता स्थापन केली. एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी सांभाळली आहे. मात्र सरकार स्थापन झाल्यानंतर आता जवळपास एक महिना होत आला आहे, तरी अजूनही राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. त्यामुळे शिंदे-फडणवीस यांच्या दिल्लीला जाण्याच्या खेट्या सुरूच आहेत. त्याचबरोबर स्टेजवर शिंदे-फडणवीसांच्या माइक वरून असो किंवा एकमेकांच्या कानात सांगण्याच्या हालचालीवरून सरकार टीकेचा धनी ठरत आहे. दरम्यान, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे.
नाना पटोले यांनी माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. यावेळी बोलताना ते म्हणाले की,’राज्यात सरकार आहे की नाही अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. कारण मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री रात्रीचे जेवण दिल्लीत करतात आणि सकाळचे मुंबईत करतात. सरकार स्थापन होऊन महिना होत आला आहे तरीही यांचा काहीच ठावठिकाणा नाही. यांच्या मागे कोणती महाशक्ती आहे ते आता समोर येत आहे.’ अशा शब्दांत नाना पटोले यांनी टीका केली.
यावेळी बोलताना त्यांनी चंद्रकांत पाटलांच्या मनावर दगड ठेवून शिंदेंना मुख्यमंत्री केले या वक्तव्यावरही भाष्य केले. ‘चंद्रकांत पाटलांच्या जे पोटात होतं तेच ओठावर आलं. आता जरी एकनाथ शिंदेंना हे पद मिळाले असले तरी येणाऱ्या काळात त्यांना कळेल आणि पश्चाताप देखील होईल, असेही नाना पटोले म्हणाले.
महत्वाच्या बातम्या :
- Ajit Pawar | राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा; अजित पवार यांची मागणी
- Pankaja Munde | पंकजा मुंडे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणाऱ्या बॅनर्स वरून भाजपचे नेते गायब
- Manisha Kayande : राज ठाकरेंनी स्वतःच्या मुलालाच राजकारणात पुढे आणलं, देशपांडेंना का नाही? – मनीषा कायंदे
- Uddhav Thackeray : राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या जंजिरमध्ये अडकलेल्यांनी खंजीरची भाषा करु नये; शिंदेंचा ठाकरेंना टोला
- Arjun Khotkar | मराठवाड्यातील शिवसेना खिळखिळी; अर्जुन खोतकर शिंदे गटात सामील
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
