Share

Arjun khotkar | “मी शिवसेना प्रमुखांशी एकनिष्ठ”; अर्जुन खोतकरांनी लावला शिंदे गटात गेल्याच्या चर्चांना ब्रेक

Published On: 

नवी दिल्ली: महाराष्ट्र सदन येथे शिवसेना नेते आणि माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. त्यांच्या या भेटीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामुळे खोतकर हे आता शिंदे गटात सामील झाले असल्याचं बोललं जात होतं. दोन दिवसांपूर्वीच “मी शिवसेनेतच राहणार”, असे अर्जुन खोतकर म्हणाले होते. मात्र आज पुन्हा दिल्लीत खोतकरांनी शिंदे यांची भेट घेतली. त्यानंतर ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी गेले असल्याचे सांगण्यात आले होते. त्यामुळे “मी शिवसेनेतच राहणार”, असे म्हणणारे खोतकर आज शिंदे गटात सामील झाले आहेत का, हा प्रश्न सर्वांनाच पडला होता. मात्र आता स्वतः खोतकरांनी या चर्चा फेटाळून लावल्या आहेत.

एकनाथ शिंदे यांच्याशी झालेल्या भेटीनंतर खोतकरांनी एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे कि,”मी माझ्या वैयक्तिक कामांसाठी दिल्लीला आलेलो आहे. मागच्या आणि या वेळेस योगायोगाने माझी अन् मुख्यमंत्र्यांची भेट झाली. मात्र या भेटीचा अर्थ मी शिंदे गटात सहभागी झालो असा नाही. मी शिवसेनाप्रमुखांचा सैनिक आहे आणि मी शिवसेनाप्रमुखांशी पूर्णपणे एकनिष्ठ आहे”.

आता स्वतः अर्जुन खोतकर यांनीच मुख्यमंत्र्यांशी झालेल्या भेटीवर अशी प्रतिक्रिया दिल्याने खोतकर शिंदे गटात सामील झाल्याच्या बातम्यांना ब्रेक लागला आहे. दरम्यान खोतकर आणि एकनाथ शिंदे यांचे काही फोटो समोर आले होते. ज्यावरून खोतकर हे शिंदे गट सामील झाले असल्याच्या चर्चांवर शिक्कामोर्तब झाले आहे, असे वाटत होते. मात्र या सगळ्या चर्चा केवळ चर्चाचं आहेत, हे खोतकरांच्या प्रतिक्रियेवरून स्पष्ट झालं आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!