Share

Ajit Pawar | राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा; अजित पवार यांची मागणी

Published On: 

मुंबई : सध्या राज्यात पूर स्थिती निर्माण झालेली आहे. अनेक भागांत शेत शिवरांमध्ये पाणी घुसल्याने शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. तसेच येत्या ऑगस्ट महिन्यात पुन्हा अतिवृष्टी होणार असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे. याच पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून ‘ओला दुष्काळ’ जाहीर करण्याची मागणी केली आहे.

या पत्रात अजित पवार यांनी लिहले आहे कि, “सततच्या पाऊसामुळे पिके वाहुन गेली असून शेतीसाठी वापरण्यात येणारी बी-बियाणे आणि खतांचे नुकसान झालेले आहे. तसेच आतापर्यंत 100 पेक्षा जास्त व्यक्तींचा अतिवृष्टीमुळे मृत्यू झाला आहे. राज्यातील काही ठिकाणची मी स्वत: पाहणी देखील केली आहे. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे बरेच नुकसान झाले आहे. काही ठिकाणी जमिनी देखील वाहुन गेल्याच्या घटना घडल्या आहेत. तसेच घरांचेही मोठया प्रमाणावर नुकसान झाले आहे. जीवित आणि वित्त हानी झाली आहे. अनेक भागांतील वीजपुरवठा विस्कळीत किंवा खंडित झाला आहे.  त्यामुळे राज्यातील सर्व जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्त यांच्या मी संपर्कात आहे..”

गेल्या काही दिवसांमध्ये अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या आहेत. याच अनुषंगाने अजित पवार म्हणाले आहेत कि, ” ज्या भागात पूरस्थिती आहे तिथे सतत सुरु असलेल्या पावसामुळे नुकसानाचे पंचनामे कारण शक्य होत नाहीये. या पूर्वी देखील अशा परिस्थिती शेतकरी आत्महत्या मोठ्या प्रमाणात झाल्याचे निदर्शनास आलेले आहे. असे काही घडू नये म्हणून तसेच शेतकऱ्यांना एक दिलासा म्हणून राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची आवश्यकता आहे”.

मंत्रिमंडळ स्थापन न झाल्यामुळे अतिवृष्टी व पूरग्रस्त भागाच्या समस्या सोडवण्यासाठी अडचण निर्माण होत आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेऊन तातडीने विधीमंडळाचे अधिवेशन बोलवावे असेही अजित पवार यांनी या पत्रात म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!