Share

Sanjay Raut : “हिंदुत्ववादी कार्यकर्ते आनंद दवे यांच्या जीवाला धोका ” ; संजय राऊत यांचे पुणे पोलिसांना आवाहन

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी पैगंबर मोहम्मद यांच्याबाबत वादग्रस्त विधान केलं होतं. त्यानंतर देशभरात मोठ्या प्रमाणात निदर्शनं करण्यात आली होती. यावेळी अनेक राज्यात निदर्शनांना हिंसक वळनदेखील लागले होते. दरम्यान, काही दिवसांपूर्वी शर्मा यांचे समर्थन केल्याप्रकरणी उदपूर येथील टेलर व्यावयायिकाची त्याच्या दुकानात घुसून हत्या करण्यात आली होती. त्यानंतर २१ जून रोजी अमरावती येथील मेडिकल व्यावयायिक असणाऱ्या उमेश कोल्हे यांची २१ जूनच्या रात्री हत्या करण्यात आली होती.

या घटनांमुळे देशातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. अशातच आता ब्राह्मण महासंघाचे नेते , कडवट हिंदुत्ववादी कार्यकर्ते आनंद दवे यांच्या जीवाला धोका असल्याचं केंद्रीय तपास यंत्रणांनी महाराष्ट्र पोलिसांना कळवलं आहे. या संदर्भात संजय राऊत यांनी ट्विट केले आहे. उदयपूर प्रमाणे काही पुण्यात घडू नये यासाठी पुणे पोलिसांनी आनंद दवे यांची काळजी घेण्याचं आवाहन संजय राऊत यांनी ट्विट च्या माध्यमातून पुणे पोलिसांना केले आहे.

“ब्राह्मण महासंघाचे नेते , कडवट हिंदुत्ववादी कार्यकर्ते आनंद दवे यांच्या जीवितास धोका असल्याचे केंद्रीय तपास यंत्रणांनी महाराष्ट्र पोलिसांना कळवले आहे. त्यामुळे उदयपूरप्रमाणे काही पुण्यात घडू नये यासाठी पुणे पोलिसांनी आनंद दवे यांची काळजी घ्यावी” अशा आशयाचं ट्विट शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केले आहे.

दरम्यान, आनंद दवे यांच्या जिवितास धोका असल्याचे केंद्रीय तपास यंत्रणानी महाराष्ट्र पोलिसांना कळवले आहे. त्यामुळे पोलीस सतर्क झाले असून, केंद्राच्या या सूचनेनंतर पोलिसांनी दवे यांचे कार्यालय, घर आणि हिंदू महासंघ कार्यालयास सशस्त्र पोलीस  संरक्षण दिले आहे. या संदर्भात पुढे काय होणार आणि अशा घटनांची मालिका कधी थांबणार असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित होत आहे.

महत्वाच्या बातम्या :

 

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!