मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण कायम सोशल मीडियावर कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे चर्चेत असते. दीपिकाला ब्युटी विथ ब्रेन असंही म्हंटल जात. नुकताच दीपिकाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. यामध्ये तिने तिच्या उत्तराने भर कार्यक्रमामध्ये एका चाहत्याला गप्प केलं आहे. दीपिकाचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे.
दीपिका पदुकोण तिचा पती रणवीर सिंग आणि कुटुंबियांसोबत कॅलिफोर्नियातील एका कोंकणी संमेलनात सहभागी झाली होती. या कार्यक्रमामध्ये दीपिकाचा एक चाहता तिला पाहून ‘वी लव्ह यू’ असं ओरडताना दिसत आहे. यावर दीपिकानंही त्याला “मी आता विवाहित आहे. जरा नीट वाग” असं उत्तर दिलं.
I just can’t ????????????????❤️❤️#DeepikaPadukone pic.twitter.com/3EUuGULIop
— ♥️ (@elitestanning) July 3, 2022
सध्या दीपिकाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. नेटकरी या व्हिडीओवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. दरम्यान, या कार्यक्रामामध्ये दीपिका गुलाबी आणि हिरव्या रंगाच्या सूटमध्ये दिसली. तिचा हा हटके अंदाज चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे.
महत्वाच्या बातम्या :


