Share

राज्य सहकारी बँक घोटाळा : तपासासाठी एसआयटीची स्थापना,’हा’ अधिकारी करणार नेतृत्व

Published On: 

मुंबई : महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणातील नेत्यांवर उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार गुन्हा दाखल करण्यात आले आहेत. मुंबईच्या एमआरए पोलीस ठाण्यात हे गुन्हे दाखल करण्यात आले आहे. या मध्ये माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

राज्य सहकारी बँकेतील कथित २५ हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा तपास करण्यासाठी आर्थिक गुन्हे शाखेने मंगळवारी विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापना केली आहे. या प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने पोलीस उपायुक्त श्रीकांत परोपकारी यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथकाची स्थापना केली. सक्तवसुली संचालनालयही (ईडी) या प्रकरणाची समांतर चौकशी करेल, अशीही माहिती मिळते. मंगळवारी आर्थिक गुन्हे शाखेत झालेल्या बैठकीदरम्यान ईडीचे अधिकारीही उपस्थित होते.

दरम्यान,मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्या प्रकरणात मोठा निर्णय दिला होता. येत्या ५ दिवसांच्या आत घोटाळ्यातील सबंधित नेत्यांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते.यानुसार सोमवारी माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलीस ठाण्यात भादंवि कलम ४०९,४०६, ४२०, ४६५, ४६७,४६८, ४९१, १२० (ब) यांसोबतच लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या कारवाईमुळे राज्याची शिखर सहकारी बँक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एमएससी बँकेतील गैरव्यवहार उघड झाला आहे. अनेक राजकीय नेते यामुळे अडचणीत सापडले आहेत.

उच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतर राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, आ. हसन मुश्रीफ आणि आ. मधुकर चव्हाण अडचणीत आले आहेत. २५ हजार कोटींचा हा घोटाळा आहे.मात्र राष्ट्रवादी नेते अजित पवार यांनी ज्या सहकारी बँक घोटाळ्या प्रकरणातील आर्थिक घोटाळ्याचे आरोप फेटाळून लावले होते . या बँक प्रकरणात मी एक रुपयात सुध्दा मिंदा नाही तरीदेखील मीडिया मात्र फक्त अजित पवार अजित पवार करत आहे. काय माझ्याबद्दल त्यांना एवढे प्रेम आहे, असे ते म्हणाले होते.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!