Share

IND vs SA : बाबो…! तेजतर्रार गोलंदाज उमरान मलिकनं मोडली टीम इंडियाच्या कॅप्टनची बॅट; VIDEO व्हायरल!

Published On: 

मुंबई : भारताचा युवा वेगवान गोलंदाज उमरान मलिकने आपल्या वेगाच्या जोरावर संपूर्ण जगात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. ज्या गतीने त्याने आयपीएलमध्ये गोलंदाजी केली त्याची संपूर्ण क्रिकेट विश्वात चर्चा झाली. त्याचवेळी, भारतीय संघात सामील झाल्यानंतरही उमरान नेट्समध्ये आपल्याच वेगानं फलंदाजांना खूप त्रास देत आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० मालिकेदरम्यान (IND vs SA) उमरान मलिकने सराव सत्रामध्ये भारतीय कर्णधार ऋषभ पंतची बॅट तुटली.

उमरान मलिक नेट्समध्ये ऋषभ पंतला गोलंदाजी करत होता. यादरम्यान त्याने एक चेंडू इतका वेगात टाकला की त्याचा बचाव करताना पंतची बॅट तुटली. उमरान पंतकडे बघत उभा राहिला. याचा एक व्हिडिओही समोर आला आहे.

https://www.instagram.com/p/CegVsFSFYII/?utm_source=ig_embed&utm_campaign=loading

उमरान मलिकने भारतीय संघाच्या नेट्स सत्रात १६३.७ किमी प्रतितास वेगाने गोलंदाजी केली. वेग मोजणाऱ्या यंत्राचे चित्रही समोर आले असून त्यात उमरानचा वेग किती आहे, ते पाहण्यात आले आहे. उमरानला आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यासाठी भारतीय संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळाले नाही. त्याऐवजी आवेश खानला संधी देण्यात आली. उमरानची गुणवत्ता पाहता त्याला पुढील सामन्यांमध्ये पदार्पणाची संधी नक्कीच मिळू शकते.

महत्त्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!