🕒 1 min read
मुंबई : भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे या नुकत्याच झी मराठीवरील ‘बस बाई बस’ या कार्यक्रमात प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित झाल्या होत्या. त्यावेळी त्यांनी विविध प्रश्नांची दिलेली उत्तर सध्या चर्चेत आहेत. तर नुकताच या कार्यक्रमाचा नवीन प्रोमो रिलीज करण्यात आला आहे. ज्यामध्ये नेहमी करारी भूमिका घेणाऱ्या आणि विरोधकांना सडेतोड प्रत्युत्तर देणाऱ्या पंकजा मुंडे या भावुक होताना दिसल्या.
कार्यक्रमात पंकजा मुंडेंना विविध व्यक्तींचे फोटो दाखवण्यात आले. फोटोत दिसणाऱ्या व्यक्तीशी ती व्यक्ती समोर आहे अशी कल्पना करून त्यांना संवाद साधायचा होता. या सेगमेंटमध्ये त्यांना त्यांचे वडील म्हणजेच स्व. गोपीनाथ मुंडे यांचा फोटो दाखवण्यात आला. जो पाहताच त्या स्तब्ध झाल्या. त्या काहीच बोलल्या नाही. तर पुढे त्या म्हणाल्या कि, “मला काहीच बोलायचं नाही. मी बाबांशी बोलतच नाही. त्यांनी आम्हाला असं अर्ध्यात सोडून जायला नको होत.” हे बोलताना त्यांच्या डोळ्यात पाणी आलं होतं. तर या कार्यक्रमात त्यांच्या भगिनी म्हणजेच प्रीतम मुंडे देखील सहभागी झाल्या होत्या.
https://www.instagram.com/p/ChHmMy2jYrm/
कॉलेजमध्ये तुम्हाला कुणी प्रपोज केलंय का?
तसेच पुढे तुम्हाला कुणी प्रपोज केलंय का? असा प्रश्न पंकजा मुंडेंना विचारण्यात आला. त्यावर त्या म्हणाल्या कि, “गोपीनाथ मुंडेसाहेब गृहमंत्री होते, तेव्हा मी कॉलेजमध्ये शिकत होते. तेव्हा मला भरपूर सिक्युरिटी असायची. त्यामुळे शक्यतो माझ्याशी बोलायला लोक घाबरायचे. पण एकदा मैत्री झाली की झाली! मग ती कायम टिकली. परंतु मला कुणी प्रपोज नाही केलं. तो सुखद अनुभव मला मिळाला नाही, असं पंकजा मुंडे म्हणाल्या. यासोबत राजकीय आणि वेगवेगळ्या गोष्टींवर त्यांना या मुलाखतीत प्रश्न विचारण्यात आले. ज्याची अगदीच मजेशीर उत्तरं त्यांनी दिली.
महत्वाच्या बातम्या:
- Sonia Gandhi | सोनिया गांधी यांना दोन महिन्यांत दुसऱ्यांदा कोरोनाची लागण
- Ambadas Danve | “शिरसाट यांचं ट्विट रात्रीचंच, अब आगे आगे देखो…”- अंबादास दानवेंचा खोचक टोला
- Sameer Wankhede | समीर वानखेडे यांना मोठा दिलासा, जात प्रमाणपत्र चौकशी समितीकडून ‘क्लीन चिट’
- Dhairyasheel Mane | “आजही उद्धव ठाकरेंनी बांधलेलं शिवबंधन हातात आहे”; धैर्यशील माने यांचे वक्तव्य चर्चेत
- Rohit Sharma | “जेव्हा तो हिरवीगार खेळपट्टी पाहतो तेव्हा तो जास्त बिर्याणी खातो” ; ‘त्या’ खेळाडूबाबत रोहित शर्माचे मोठे विधान
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
