🕒 1 min read
औरंगाबाद : तब्बल ३८ दिवस रखडलेला महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार अखेर झाला. पहिल्या टप्प्यातील या विस्तारात शिंदे गटाच्या ९ आणि भाजपच्या ९ आमदारांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. यामध्ये ज्यांची नावं चर्चेत होती अशा अनेक आमदारांना संधी मिळालीच नाही. अपक्ष आणि महिला आमदारांचाही यात समावेश नव्हता. त्यामुळे अपक्ष आमदारांसह शिंदे गटातील आमदारांमध्येही नाराजी असल्याचं बोललं जात आहे. त्यातच काल शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी केलेलं ट्विट चर्चेत आहे. त्यावरच आज विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी प्रतिक्रिया देताना शिंदे गटाला टोला लगावला आहे.
अंबादास दानवे हे आज माध्यमांशी बोलताना म्हणाले कि, “संजय शिरसाट यांनी केलेलं ट्विट सकाळचं नसून काल रात्रीचंच होतं. मला यावर अजून काहीही बोलायचं नाही. मी फक्त एवढच सांगेल कि ते ट्विट रात्रीचंच होत.” तसेच जाता जाता “आगे आगे देखो होता है क्या!” असं म्हणत त्यांनी शिंदे गटाला आणि भाजपला अप्रत्यक्ष इशाराच दिला आहे. तसेच आज दानवे यांनी पक्षाचे जेष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांची भेट घेतली. पक्ष बांधणीसाठी आणि वाढवण्याची खैरे यांची भेट घेऊन त्यांचे मार्गदर्शन घेतले असल्याचे दानवेंनी सांगितले. तर खैरे यांनी दानवेंना पेढा भरवून विरोधी पक्षनेते म्हणून चांगलं काम करण्यासाठी शुभेच्छा दिल्याची माहिती समोर आली आहे.
काय आहे ट्विट प्रकरण?
आमदार संजय शिरसाट यांनी शुक्रवारी रात्री उद्धव ठाकरेंचा एक जुना व्हिडिओ ट्वीट केला होता. यामध्ये ‘उद्धव ठाकरे’ यांचा महाराष्ट्राचे कुटुंबप्रमुख असा उल्लेख करण्यात आला होता. एवढेच नव्हे तर, शिरसाट यांनी ट्वीट सोबत विधानसभेतील उद्धव ठाकरेंचे एक भाषण देखील जोडले होते. मात्र, काही वेळाने त्यांनी हे ट्वीट डिलिट केले गेले. उद्धव ठाकरे यांच्या बाबतचे ट्वीट मोबाईलच्या तांत्रिक अडचणीमुळे झाले होते. चूक लक्षात येताच आम्ही ते ट्वीट डिलीट केले, असे संजय शिरसाट यांनी स्पष्ट केले.
महत्वाच्या बातम्या:
- Sameer Wankhede | समीर वानखेडे यांना मोठा दिलासा, जात प्रमाणपत्र चौकशी समितीकडून ‘क्लीन चिट’
- Dhairyasheel Mane | “आजही उद्धव ठाकरेंनी बांधलेलं शिवबंधन हातात आहे”; धैर्यशील माने यांचे वक्तव्य चर्चेत
- Rohit Sharma | “जेव्हा तो हिरवीगार खेळपट्टी पाहतो तेव्हा तो जास्त बिर्याणी खातो” ; ‘त्या’ खेळाडूबाबत रोहित शर्माचे मोठे विधान
- Sanjay Shirsat | ‘त्या’ ट्वीटवर संजय शिरसाट यांचे स्पष्टीकरण! म्हणाले, “मला मंत्रिपदाबाबत…”
- Sanjay Shirsat | उद्धव ठाकरेंचा जुना व्हिडीओ ट्वीट करत संजय शिरसाट यांचा एकनाथ शिंदेंना इशारा!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
