Share

Dhairyasheel Mane | “आजही उद्धव ठाकरेंनी बांधलेलं शिवबंधन हातात आहे”; धैर्यशील माने यांचे वक्तव्य चर्चेत

Published On: 

🕒 1 min read

दिल्ली : तब्बल ३८ दिवस रखडलेला महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार अखेर झाला. पहिल्या टप्प्यातील या विस्तारात शिंदे गटाच्या ९ आणि भाजपच्या ९ आमदारांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. यामध्ये ज्यांची नावं चर्चेत होती अशा अनेक आमदारांना संधी मिळालीच नाही. अपक्ष आमदारांचाही यात समावेश नव्हता. त्यामुळे अपक्ष आमदारांसह शिंदे गटातील आमदारांमध्येही नाराजी असल्याचं बोललं जात आहे. त्यातच काल शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी केलेलं ट्विट चर्चेत आहे. तर आज शिंदे गटाचे खासदार धैर्यशील माने यांनी देखील तशाच प्रकारचं वक्तव्य केलं आहे.

एका खाजगी वृत्तवाहिनीशी बोलताना धैर्यशील माने म्हणाले की, “आजही माझ्या हातावर शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी बांधलेलं शिवबंधन आहे. त्यामुळे मी कधीही उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे किंवा ठाकरे कुटुंबाच्या विरोधात चुकीचे वक्तव्य करणार नाही. त्यांच्यावर कोणतीही टीका करणार नाही. ठाकरे घराण्याबद्दल मला जो आदर होता तो पुढेही नेहमीच राहील. ठाकरे कुटुंबीयांबद्दल मला असलेला जिव्हाळा भविष्यातही कायम राहील. ठाकरे कुटुंबाला कोणाचीही दृष्ट लागू नये हीच आमची इच्छा असेल.”, तर ठाकरे कुटुंबाबद्दल हे वक्तव्य करत असताना धैर्यशील माने भावुक झाले होते. परंतु माने यांनी केलेलं वक्तव्य ऐकून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत

पुढे बोलताना ते असेही म्हणाले, “2019 मध्ये जी आघाडी झाली होती ती मुळातच अनैसर्गिक होती. त्यामुळे आमचा विरोध हा महाविकास आघाडीला आहे. उद्धव ठाकरेंना नाही. आम्हा कोणालाही उद्धव ठाकरे यांना सोडायचं नव्हतं. त्यासाठीच आम्ही आमच्या समस्या त्यांना प्रत्यक्षात भेटून देखील सांगितल्या होत्या.”, असा खुलासाही त्यांनी यावेळी केला.

काय म्हणाले शिरसाट?

आमदार संजय शिरसाट यांनी शुक्रवारी रात्री उद्धव ठाकरेंचा एक जुना व्हिडिओ ट्वीट केला होता. यामध्ये ‘उद्धव ठाकरे’ यांचा महाराष्ट्राचे कुटुंबप्रमुख असा उल्लेख करण्यात आला होता. एवढेच नव्हे तर, शिरसाट यांनी ट्वीट सोबत विधानसभेतील उद्धव ठाकरेंचे एक भाषण देखील जोडले होते. मात्र, काही वेळाने त्यांनी हे ट्वीट डिलिट केले गेले. उद्धव ठाकरे यांच्या बाबतचे ट्वीट मोबाईलच्या तांत्रिक अडचणीमुळे झाले होते. चूक लक्षात येताच आम्ही ते ट्वीट डिलीट केले, असे संजय शिरसाट यांनी स्पष्ट केले.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!