Share

एकवेळ फाटक्या माणसाच्या पायावर डोकं ठेवेन, पण…- पंकजा मुंडे

Published On: 

🕒 1 min read

बुलढाणा : विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी राजकीय पक्षांनी आपल्या उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. भाजपकडून पंकजा मुंडे (Pankja Munde) यांना उमेदवारी मिळेल अशी त्यांना आणि त्यांच्या समर्थकांना अपेक्षा होती, परंतु समर्थकांचा मोठा अपेक्षाभंग झाल्याचं पाहायला मिळालं आहे. यानंतर पंकजा मुंडे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. राजकीय पुनर्वसन न झाल्याने पंकजा मुंडे यांची पक्षावरची नाराजी पुन्हा एकदा स्पष्ट दिसून आली आहे.

बुलढाण्यातील दुसरबीड येथे माजी आमदार तोताराम कोयंदे (Totaram Koyande) यांच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात पंकजा मुंडे यांनी आपल्या मनातील खदखद व्यक्त केली आहे. दरम्यान, भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांना 2 वर्षांनंतर विधान परिषदेची उमेदवारी मिळाली आहे.

माझे माता-पिता, माझे सर्वस्व तुम्ही आहात. एखाद्या गरीब फाटक्या माणसाच्या पायावर डोकं ठेवून नतमस्तक होईन, पण पदासाठी कुणासमोर हात पसरणार नाही. आमच्या रक्तातच तशी सवय नाही. ‘राजकारणात संधी मिळाली नाही, पण लोकांच्या सेवेची संधी सोडणार नाही’, अशी शपथ मी गोपीनाथ मुंडे यांना अग्नी देताना घेतली होती असे सांगतानाच पद असो वा नसो, जनतेच्या सेवेला प्राधान्य देईन. कार्यकर्त्यांना आणि जनतेला कधीच अंतर देणार नाही, असं पंकजा मुंडे उपस्थितांना संबोधित करताना म्हणाल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!