Share

मराठी साहित्याशी संबंध नसलेल्या जावेद अख्तरांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलवण्याचे औचित्य काय? भाजपचा सवाल

Published On: 

मुंबई: नाशिक येथे होणार्‍या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन पानिपतकार विश्वास पाटील यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी गीतकार जावेद अख्तर आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित रहाणार आहेत, असे संमेलनाचे स्वागताध्यक्ष छगन भुजबळ यांनी २० नोव्हेंबर रोजी घोषित केले आहे. मात्र विविध स्तरांतून जावेद अख्तर यांच्या नावाला विरोध होऊ लागल्यावर अख्तर यांना आता प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित करण्यात आले आहे. आता यावरूनच भाजप नेते अतुल भातखळकर यांनी ठाकरे सरकारवर निशाना साधत संतप्त सवाल केला आहे.

मराठी साहित्याशी कोणताही संबंध नसलेल्या आणि सतत हिंदू विरोधी भूमिका घेणाऱ्या जावेद अख्तर यांना मराठी साहित्य संमेलनात प्रमुख पाहुणे म्हणून बोलण्याचे औचित्य काय? हे स्वागताध्यक्ष छगन भुजबळ यांनी सांगितले तर बरे होईल. असा सवाल करणारे खोचक ट्वीट अतुल भातखळकर यांनी केले आहे. यातून त्यांनी भुजबळ यांना चांगलाच टोला लगावला आहे.

दरम्यान ‘भुजबळ नॉलेज सिटी’च्या प्रांगणात ३ ते ५ डिसेंबर या कालावधीत ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार आहे. या संमेलनाला मावळते संमेलनाध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो उपस्थित रहाणार आहेत, तर समारोपाच्या सत्रात राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर उपस्थित राहतील.

महत्त्वाच्या बातम्या

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!