Share

लय भारी!! पुण्याचे महापौर ठरले देशातील सर्वाधिक लोकप्रिय

Published On: 

🕒 1 min read

पुणे : पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ (Mayor Murlidhar Mohot) यांच्या शिरपेचात सध्या सोशल मीडियावर मानाचा तुरा रोवला आहे. महापौर मोहोळ हे अनेक बाबतीत लोकप्रिय ठरताना दिसत आहेत. मुरलीधर मोहोळ यांनी ट्वीटरवर 1 लाख फॉलोअर्सचा ट्प्पा ओलांडला आहे. मुरलीधर मोहोळ हे आपल्या राहणीमानानुसार स्मार्ट असलेले स्मार्ट सिटीचे महापौर हे प्रत्येक गोष्टीत स्मार्ट असल्याचे त्यांनी दाखवून दिले आहे.

गेल्या महिन्यात देखील त्यांची महापौर परिषदेच्या उपाध्यक्षपदी निवड झाली होती. मात्र यंदा आनंदाची बातमी म्हणजे पुणे शहराचे प्रतिनिधित्व करणारे मुरलीधर मोहोळ आता ट्विटर वर 1 लाख फॉलोअर्स असणाऱ्या महापौरांमध्ये अव्वल ठरले आहेत. मुरलीधर मोहोळ हे ट्वीटरवर नेहमी अ‌ॅक्टीव्ह असतात. मुरलीधरांच्या सतत लोकांचे प्रश्न सोडवणे, जागरूक असणे, दक्ष राहणे यामध्ये नागरिकांच्या मनात त्यांची वेगळी छाप आहे.

आपल्या ट्विटर हँडलने आज 1 लाख फॉलोअर्सचा टप्पा ओलांडला. ट्विटरचा परिवार केवळ पुणे शहरातच नाही तर देश आणि विदेशातही पसरला आहे हे सुखावणारं आहे. आपला माझ्याबद्दल असलेला जिव्हाळा, प्रेम, आपुलकी आणि विश्वास यामुळे हा टप्पा आपण ओलांडू शकलो. आपणा सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद!, असं ट्वीट करत मुरलीधर मोहोळ यांनी सर्व फॉलोअर्सचे आभार मानले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!