मुंबई : २०१९ची महाराष्ट्रातील निवडणूक खऱ्या अर्थाने ऐतिहासिक ठरली होती. मात्र या ऐतिहासिक घडामोडीची खरी सुरवात झाली होती ती १८ ऑक्टोबर २०१९ रोजी साताऱ्यामधून. राष्ट्रवादीला एकामागून एक नेते रामराम ठोकत होते. भाजपने तर समोर लढायला ‘पैलवान’ नाहीच अशा अविर्भावात लढायला सुरवात केली होती.
महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटणी देणारी शरद पवारांची (Sharad Pawar)ती भर पावसातील ऐतिहासिक सभा साताऱ्यात झाली. या सभेने फक्त साताऱ्याचेच तर राज्याचे राजकारण बदलले होते. 80 वर्षांचे शरद पवार भर पावसात भाजपवर तुटून पडले होते, आणि राज्यातील युवा पिढी त्यांना भरघोस पाठिंबा देत होती. आजही शरद पवारांची पावसातील सभा चर्चेत आहे.
आता पुन्हा एकदा शरद पवारांच्या पावसातील सभेची आठवण झाली आहे. मात्र यावेळी भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी पुण्यात भर पावसात भाषण केले. त्यामुळे सर्वत्र शरद पवारांच्या भाषणाची आठवण करून दिली असल्याचे म्हंटले जात आहे. पुणे शहरातील नवी पेठेतील सेनादत्त पोलीस चौकीसमोरील चौकाचे सामाजिक कार्यकर्ते स्वर्गीय सुरेश आप्पा माळवदकर असे नामकरण करण्यात आलं.
या कार्यक्रमामध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते फलक अनावरण करण्यात आल्यानंतर मुख्य कार्यक्रम सुरुवात झाली. मात्र त्यानंतर त्याचे भाषण सुरु असतानाच काही वेळातच पावसाचे आगमन झाले. मात्र त्यांनी पाऊस पडू लागल्यानंतरही भाषण थांबवले नाही तर चंद्रकांत पाटील हे पावसामध्ये भिजतच भाषण देत होते. सध्या चंद्रकांत पाटलांच्या या सभेची जोरदार चर्चा होत असल्याचे पाहायला मिळत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- …तर आर्यन खान प्रकरण कशासाठी घडवले याचा तपास करावा लागेल- दिलीप वळसे पाटील
- ‘जे लोक हिंदुत्ववादी संघटनेशी संबंधित आहेत त्यांनाच जाणीवपूर्वक लक्ष्य केलं जातय’
- …तर साडेचारशे शेतकऱ्यांचे बळी गेले नसते, शिवसेना नेते चंद्रकांत खैरेंचा मोदींना टोला!
- ‘इंदिरा गांधींनी खलिस्तान्यांना डासांप्रमाणे चप्पलेखाली चिरडलं अन्…’
- गरज पडल्यास रद्द केलेले कृषी कायदे पुन्हा आणू; भाजप खासदाराचं खळबळजनक वक्तव्य


