Share

PAK vs AUS: काय सांगता! पाकिस्तानने २० वर्षांनी जिंकली मालिका, बाबर- इमामने कांगारूंना धुतले

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळली गेली. ज्यात पाकिस्तानच्या संघाने ही मालिका २-१ ने जिंकली आहे. पहिला सामना जिंकून ऑस्ट्रेलियन संघाने पाकिस्तान संघावर दडपण आणले होते, मात्र बाबरच्या सैन्याने जबरदस्त झुंज देत त्यानंतरच्या दोन सामन्यात कांगारूंचा पराभव केला आहे.

लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या शेवटच्या सामन्यात पाकिस्तानने (PAK vs AUS) ऑस्ट्रेलियाचा ९ गडी राखून पराभव केला आहे. ज्यामध्ये पाकिस्तान संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानसमोर विजयासाठी २११ धावांचे लक्ष्य ठेवले होते. ऑस्ट्रेलियाची सुरुवात खराब झाली. सलामीवीर फिंच आणि हॅड यांना खातेही उघडता आले नाही. त्यामुळे ऑस्ट्रेलियन संघ मोठी धावसंख्या उभारण्यात अपयशी ठरला.

लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तान संघाने ३७. ५ षटकांत १ गडी गमावून २११ धावांचे लक्ष्य गाठले. पाकिस्तानची पहिली विकेट २४ धावांवर फखर जमानच्या रूपाने पडली, मात्र त्यानंतर ऑस्ट्रेलियन संघाच्या गोलंदाजांनी विकेट घेण्यासाठी झगडले, मात्र बाबर आझम (babar azam) आणि इमाम-उल-हक (imam ul haq) यांनी शेवटपर्यंत आपली विकेट गमावली नाही. बाबर आझम आणि इमाम-उल-हक यांनी दुसऱ्या विकेटसाठी नाबाद १९० धावांची भागीदारी करून पाकिस्तानला विजय मिळवून दिला. यासह पाकिस्तान संघाने २० वर्षांनंतर ऑस्ट्रेलिया विरुद्ध मालिका जिंकली आहे.

IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!