Share

Raj Thakrey : राज ठाकरेंची विचारपूस करण्यासाठी गायिका आशाताई ‘शिवतीर्थ’ वर

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांना पायाचं दुखणं वाढल्यामुळे डॉक्टरांनी हिप बोनची शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला होता. गेल्या महिन्यात लीलावती रुग्णालयात त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून राजकीय क्षेत्रातील अनेक दिग्गजांनी त्यांची भेट घेत तब्येतीची विचारपूस केली आहे.

दरम्यान आज ख्यातनाम पार्श्वगायिका आशाताई भोसले यांनी शिवतीर्थ निवासस्थानी राज ठाकरेंची भेट घेऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली आहे. याबाबत मनसेच्या अधिकृत ट्वीटरवर पोस्ट करण्यात आली आहे.

देवेंद्र फडणवीस -राज ठाकरे ठाकरे भेट-

काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही राज ठाकरेंची भेट घेतली होती. त्यावेळी अनेक तर्क-वितर्क लावले गेले. मात्र फडणवीस यांनी राज ठाकरेंची विचारपूस करण्यासाठी भेट घेतली असल्याचे स्पष्ट केले होते. राज्यात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार स्थापन झाल्यानंतर राज ठाकरे यांनी नव्या सरकारला शुभेच्छा दिल्या होत्या. तर राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री झाल्यानंतर फडणवीसांना कौतुक करणारे पत्रही पाठवले होते.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!