मुंबई : आज आयपीएल २०२२मधील ११ वा सामना चेन्नई सुपर किंग्ज (CSK) आणि पंजाब किंग्ज (PBKS) यांच्यात खेळवला जाईल. दोन्ही संघांमधील हा सामना मुंबईत होणार आहे. आयपीएलच्या चालू मोसमात प्रथमच दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत. सीएसके लीगच्या १५व्या हंगामात पहिल्या विजयाची वाट पाहत आहे. रवींद्र जडेजाच्या नेतृत्वाखालील चेन्नई संघाची यंदाच्या मोसमात खूपच खराब सुरुवात झाली.
सीएसकेने आतापर्यंत दोन सामने खेळले असून यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. लीगच्या इतिहासात सीएसकेने सुरुवातीचे सलग दोन सामने गमावण्याची ही पहिलीच वेळ आहे. पंजाब किंग्जविरुद्धच्या आजच्या सामन्यात रवींद्र जडेजाच्या संघाला विजयाची नोंद करायची आहे.
आयपीएल २०२२चा पहिला सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात खेळला गेला. या सामन्यात चेन्नईलाला लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले. यानंतर, सीएसकेचा पुढील सामना लखनऊ सुपर जायंट्ससोबत झाला. या सामन्यातही सीएसकेला ६ विकेट्सनी पराभव स्वीकारावा लागला होता.
दोन्ही संघांची संभाव्य प्लेइंग इलेव्हन –
चेन्नई सुपर किंग्ज : ऋतुराज गायकवाड, रॉबिन उथप्पा, मोईन अली, शिवम दुबे, अंबाती रायुडू, रवींद्र जडेजा (कर्णधार), महेंद्रसिंह धोनी, ड्वेन प्रिटोरियस, ड्वेन ब्राव्हो, राजवर्धन हंगरगेकर, मिचेल सँटनर.
पंजाब किंग्ज : मयंक अग्रवाल (कर्णधार), शिखर धवन, भानुका राजपक्षे, लियाम लिव्हिंगस्टोन, ओडियन स्मिथ, शाहरुख खान, राज बावा, हरप्रीत ब्रार, कगिसो रबाडा, अर्शदीप सिंग, राहुल चहर.
महत्त्वाच्या बातम्या –
- Women’s World Cup Final : बाब्बो..! एलिसा हिलीनं रचला वर्ल्ड रेकॉर्ड; पहिल्यांदाच घडलीय ‘अशी’ गोष्ट!
- बॉलिवूड रॅपर बादशाह झालाय ‘या’ आजारचा शिकार
- “…तर राजकारण सोडून देईल”, जितेंद्र आव्हाडांचे राज ठाकरेंना जाहीर आव्हान
- IPL 2022 : आई गं..! मुंबईच्या तिलक वर्माचा सिक्स कॅमेरामनसाठी ठरला असता जीवघेणा; पाहा VIDEO!
- “राज ठाकरे दर पाच वर्षांनी आपला रंग बदलतात…” – जितेंद्र आव्हाड
IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

