मुंबई : काल (२ एप्रिल) गुढीपाडव्यानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांची शिवाजी पार्कमध्ये जाहीर सभा झाली. यावेळी बोलत असतांना राज ठाकरेंनी वेगवेगळ्या मुद्द्यांवरून शिवसेना आणि राष्ट्रवादीवर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला. तसेच यावेळी त्यांनी राज्यातील मदरशांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे केली. दरम्यान, या मुद्द्यावरून आता राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी राज ठाकरेंवर टीका केली आहे.
यासंदर्भात जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट केले असून ट्विटमध्ये ते म्हणाले आहेत की,‘राज ठाकरे यांनी मुंब्र्याबद्दल कारण नसताना जातीयवादी विधान केले. माझं राज यांना जाहीर आव्हान आहे की, त्यांनी माझ्यासोबत मुंब्र्यातील कोणत्याही मदरशात यावे. दाढीचा वस्तरा जरी सापडला तरी राजकारण सोडून देईल. मुंब्र्यात काही शतक हिंदू मुसलमान प्रेमानी राहतात मुंब्र्याला बदनाम करू नका’, असे आव्हाड म्हणाले.
दरम्यान, पुढे ते म्हणाले की,‘कळवा-मुंब्रा ह्या मतदार संघात ६७% हिंदू आहेत आणि ३३% मुसलमान त्यात मी ७५००० मतांनी विजयी झालो कळव्यातून ३०००० ची आघाडी आणि मुंब्र्यातून ४५००० मतांची आघाडी.’ तसेच लोकं कामावर मतं देतात जाती पाती वर नाही. त्यासाठी १८ तास राबावे लागते.शेवटच्या माणसा पर्यंत पोहचावे लागते, असेही आव्हाड म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
- ‘KGF’ चॅप्टर 2 बाहुबलीचा रेकॉर्ड तोडणार का?
- “शिवाजी पार्कातील कालचा भोंगा…”, संजय राऊतांचा राज ठाकरेंना जोरदार टोला
- IPL 2022 : नवी मुंबईत दिसला सुपरमॅन..! बटलरच्या ‘त्या’ कॅचचं कौतुक करावं तेवढं कमीच; पाहा VIDEO
- “अक्कलदाढ एवढी उशिरा का येते?”, संजय राऊतांचे टीकास्त्र
- IPL 2022 : “मन दुखावलं गेलं…”, गुजरातविरुद्धचा पराभव पंतच्या लागला जिव्हारी; वाचा काय म्हणाला तो!


