Share

Women’s World Cup Final : बाब्बो..! एलिसा हिलीनं रचला वर्ल्ड रेकॉर्ड; पहिल्यांदाच घडलीय ‘अशी’ गोष्ट!

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : ऑस्ट्रेलियाची यष्टीरक्षक फलंदाज एलिसा हिलीने महिला विश्वचषकात इतिहास रचला आहे. न्यूझीलंडमध्ये खेळवण्यात येत असलेल्या या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात हिलीने १३८ चेंडूत विक्रमी १७० धावा केल्या. प्रथम फलंदाजी करताना हिलीची शतकी खेळी आणि सलामीवीर रॅचेल हेन्सच्या ६८ धावांच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने इंग्लंडसमोर ३५७ धावांचा डोंगर उभा केला. ऑस्ट्रेलियन संघ सातव्यांदा चॅम्पियन बनण्याच्या इराद्याने मैदानात उतरला आहे. एलिसा हिली एका विश्वचषका ५०० हून अधिक धावा करणारी पहिली महिला क्रिकेटपटू ठरली आहे.

याआधी न्यूझीलंडच्या डेबी हॉकलीने १९९७ मध्ये भारतात झालेल्या विश्वचषकात ४५६ धावा केल्या होत्या. मात्र, आता तिची तिसऱ्या क्रमांकावर घसरण झाली आहे. सध्याच्या विश्वचषकात हिलीने ५०९ धावा केल्या आहेत तर तिची सलामीची जोडीदार रेचेल हेन्सने ४९७ धावा केल्या आहेत. हिलीचे हे सलग दुसरे शतक आहे. यापूर्वी तिने वेस्ट इंडीजविरुद्धही शतक झळकावले होते.

हिलीने १०० चेंडूत आपले शतक पूर्ण केले. ४६व्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर अन्या श्रबसोलच्या चेंडूवर जोन्सकडून ती यष्टीचीत झाली. या खेळीत तिने २६ चौकार मारले. विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात १५० पेक्षा जास्त धावा करणारा हिली पहिला खेळाडू ठरली आहे. याशिवाय उपांत्य फेरी आणि अंतिम फेरीत शतक झळकावणारी ती पहिली फलंदाज ठरली आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!