🕒 1 min read
नवी दिल्ली: १८ तारखेला देशांतील सर्वोच्च अशा राष्ट्रपती पदासाठी देशात निवडणूक पार पडली. एनडीएकडून द्रोपदी मुर्मू तर यूपीएकडून यशवंत सिन्हा यांच्यात चुरशीची लढत पाहायला मिळाली. देशभरातील आमदार-खासदारांचे संख्याबळ लक्षात घेतले तर द्रौपदी मुर्मू यांचे पारडे जड असल्याचे चित्र आधीपासूनच दिसत होते. देशाच्या १५ व्या राष्ट्रपती म्हणून द्रौपदी मुर्मू सहज निवडून येतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु होती. आणि ही चर्चा खरी ठरली. आदिवासी समाजाच्या महिला द्रौपदी मुर्मू ( Draupadi Murmu) याच भारताच्या पंधराव्या राष्ट्रपती ठरल्या आहेत.
यावेळी विरोधी पक्षातील आमदार आणि खासदारांनीही द्रौपदी मुर्मू यांना मतदान केल्याचे दिसून आले. देशभरातील 17 खासदार आणि 104 आमदारांनी क्रॉस व्होटिंग करत मुर्मू यांना मतदान केले. त्यामुळे मुर्मू यांना जेवढे मते मिळणार होते, त्याच्यापेक्षा अधिक मते त्यांना मिळाली.
भाजपच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत मुर्मू यांच्या विजयाचा जल्लोष केला आहे. मतमोजणी दरम्यान मुर्मू आघाडीवर असल्याने त्यांचा विजय निश्तित मानला जात होता. द्रौपदी मुर्मू यांना 1,333 मतं मिळाली आहेत. तर विरोधी पक्षाचे उमेदवार यशवंत सिन्हा यांना 812 मतं मिळाली आहेत.
दरम्यान, भाजपने द्रौपदी मुर्मू यांची उमेदवारी जाहीर केल्यापासूनच त्यांची चर्चा देशभर सुरू होती. मुर्मू यांच्यासाठी भाजपने देशभरात जोर लावला होता. त्यासाठी त्यांनी अनेक पक्षांना मतदानासाठी आवाहन केलं होतं. विरोधी पक्षातील काही पक्षांनीही त्यांना या निवडणुकीत मतदान केलं आहे. त्यामुळे त्यांना या निवडणुकीत मोठी मदत झाली आहे. तसेच द्रौपदी मुर्मू विजयानंतर आता 25 जुलैला राष्ट्रपतीपदाची शपथ घेतील. त्याआधी म्हणजेच 24 जुलै सध्याचे विद्यमान राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ संपणार आहे.
महत्वाच्या बातम्या:
- sanjay raut : “भाजपची मंडळी ‘आयत्या बिळावर नागोबा’ होण्याचा…”, OBC आरक्षणावरून शिवसेनेचा टोला
- County Cricket : भारतीय खेळाडूंचा काउंटी चॅम्पियनशीपमध्ये जलवा, ‘या’ गोलंदाजाने घेतल्या ५ विकेट
- Draupadi Murmu : मोठी बातमी : द्रौपदी मुर्मू भारताच्या नव्या राष्ट्रपती, देशभरात जल्लोष
- ODI Cricket : वनडे क्रिकेटला हटवण्याबाबत वसीम अक्रमचं धक्कादायक वक्तव्य, म्हणाला…!
- Praful Patel : राष्ट्रवादीला मोठा धक्का ! ईडीकडून प्रफुल पटेल यांची संपत्ती जप्त
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
