Share

“…नाहीतर बोगस माजी मुख्यमंत्री म्हणून होकार द्या” ; दिपाली सय्यद भोसलेंचा फडणवीसांवर वार

Published On: 

🕒 1 min read

मुंबई :  शिवसेना नेत्या दिपाली सय्यद भोसले या मागील काही दिवसांपासून आपल्या राजकीय वक्तव्यांमुळे चांगल्याच चर्चेत आल्या आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर दिपाली सय्यद भोसले मागील काही दिवसांपासून सातत्याने टीका टिप्पणी करत आहेत. कधी पत्रकार परिषद घेऊन तर कधी सोशल मिडीयाच्या माध्यमातून त्यांनी राज ठाकरे यांच्यावर सातत्याने टीका केली आहे. दिपाली सय्यद भोसले हे आपल्या सडेतोड बोलण्यामुळे माध्यमाचे लक्ष वेधून घेत आहेत. आता दिपाली भोसले यांनी ट्वीट करत विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे.

भाजपने औरंगाबाद शहरात जल आक्रोश मोर्चा काढला आहे. या मोर्चामध्ये विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री राऊसाहेब दानवे, केन्द्रीय मंत्री भागवत कराड हे उपस्थित होते. आता या जल आक्रोश मोर्चा वरून दिपाली सय्यद भोसले यांनी देवेंद्र फडणवीस यांना घेरले आहे. दिपाली सय्यद भोसले ट्विट करत म्हणाले की, “जल आक्रोश हे कारण नाही. साकळाई सिंचनाचे ८०० कोटीचा हिशेब नाही, फडणविस साहेब पैसे वापरले कुठे उत्तर द्या, नाहीतर माजी बोगस मुख्यमंत्री म्हनुन होकार द्या.” ट्विट मध्ये दिपाली भोसले यांनी फडणवीसांवर भ्रष्टाचाराचे आरोप केल्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

नगर आणि श्रीगोंदा तालुक्यातील जवळपास ३५ गावांना साकळाई सिंचन प्रकल्प यासाठी दिपाली सय्यद भोसले यांनी यापूर्वीही आंदोलन केले होते. आता या सिंचन प्रकल्पात ८०० कोटींचा अनागोंदी असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!