🕒 1 min read
मुंबई : सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात उत्तर प्रदेशचे भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांचे नाव चर्चेत आहे. जेव्हापासून त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला विरोध सुरू केला. तेव्हापासून ते महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्रबिंदू बनले आहेत. राज ठाकरे यांनी पुण्यातील सभेत त्यांच्या विरोधात महाराष्ट्रातून रसद पुरवली असल्याचा आरोप केला होता. त्यांच्या मागे भाजप असल्याची चर्चा रंगली होती. खुद्द ब्रिजभूषण सिंह यांनीही राज ठाकरेंना विरोध करून एकप्रकारे पक्षाचे काम करत असल्याची कबुली दिली होती. त्यांच्या या वक्तव्यानंतर महाराष्ट्र भाजप बॅकफूटवर आला आहे. मात्र मनसेने आज (मंगळवार) राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि ब्रिजभूषण सिंह यांचा फोटो शेअर करून खळबळ माजवण्याचा प्रयत्न केला, यावर गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांनी प्रतिक्रिया दिली आहे.
गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले, “शरद पवार आणि ब्रिजभूषण सिंह कुस्ती संघटनांचे प्रमुख आहेत. एका कुस्तीचा कार्यक्रमातील जुना फोटो मनसेने शेअर केला आहे. त्यामुळे त्या फोटोचा राजकीय सबंध लावायची गरज नाही.”
मनसे नेते गजानन काळे यांनी सोशल मीडियावर तीन फोटो ट्विट केले आहेत. या तिन्ही फोटोंमध्ये राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि अध्यक्ष शरद पवार ब्रिजमोहन सिंग यांच्यासोबत दिसत आहेत. महाराष्ट्रातील मावळ परिसरात झालेल्या कुस्ती स्पर्धेदरम्यान हे छायाचित्र काढण्यात आले आहे. ही छायाचित्रे केव्हा घेण्यात आली हे स्पष्ट झालेले नसले तरी. या फोटोच्या माध्यमातून मनसेने शरद पवारांचा खरपूस समाचार घेत लिहिले की, “ब्रिज” चे निर्माते … सुज्ञास अधिक सांगणे न लगे … ( फोटो झूम करून पाहावा…).
"ब्रिज" चे निर्माते … सुज्ञास अधिक सांगणे न लगे …
( फोटो झूम करून पाहावा…) pic.twitter.com/oYQZnMbM7Y
— Gajanan Kale (@MeGajananKale) May 24, 2022
तुम्ही चित्र झूम करून पाहिले तरी तुम्हाला फक्त ब्रिजभूषण आणि शरद पवारच दिसतील. राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला विरोध करणारी व्यक्ती आणि कट रचणारी व्यक्ती शरद पवार असल्याचं मनसेनं लिहिले आहे.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
