Share

Women’s T20 Challenge 2022 TBL vs SNO : स्मृती मंधानाच्या ट्रेलब्रेझर्सनं सुपरनोव्हासला १६३ धावांवर रोखलं!

Published On: 

मुंबई : यावर्षीच्या महिला टी-२० चॅलेंज स्पर्धेचा (Women’s T20 Challenge 2022) पहिला सामना ट्रेलब्लेझर्स आणि सुपरनोव्हास (TBL vs SNO) यांच्यात रंगत आहे. पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट स्टेडियमवर रंगणाऱ्या या सामन्यात सुपरनोव्हासची कप्तान हरमनप्रीत कौरने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. हेली मॅथ्यूजच्या दमदार गोलंदाजीच्या जोरावर ट्रेलब्रेझर्सने सुपरनोव्हासला २० षटकात १६३ धावांवर रोखले. सुपरनोव्हाससाठी कप्तान हरमनप्रीत कौरने सर्वाधिक ३७ धावांची खेळी केली.

सुपरनोव्हासचा डाव

डिआंड्रा डॉटिन आणि प्रिया पुनिया या सलामीवीरांनी सुपरनोव्हासला अर्धशतकी सुरुवात करून दिली. डॉटिनने आक्रमक फटके खेळले आणि ५ चौकार आणि एका षटकारांसह ३२ धावा केल्या. चोरटी धाव घेण्याच्या नादात तिला शर्मीन अख्तरने धावबाद केले. पुनियाही (२२) जास्त वेळ मैदानावर टिकू शकली नाही. हेली मॅथ्यूजने तिचा त्रिफळा उडवला त्यानंतर आलेल्या हरलीन देओलेनेही जलद ३५ धावा केल्या. संघाचे शतक फलकावर लावून ती तंबूत परतली. बांगलादेशची अनुभवी खेळाडू सलमा खातूनने तिला बाद केले. कप्तान हरमनप्रीत कौरने संयमी फलंदाजी केली. तिने ४ चौकारांसह ३७ धावा केल्या आणि संघाला दीडशेपार पोहोचवले. १९व्या षटकात ती धावबाद झाली. हेली मॅथ्यूजने टाकलेल्या शेवटच्या षटकात सुपरनोव्हासला तीनच धावा घेता आल्या. २० षटकात सुपरनोव्हासने सर्वबाद १६३ धावा केल्या. ट्रेलब्रेझर्सकडून मॅथ्यूजने सर्वाधिक ३ बळी घेतले.

दोन्ही संघांची Playing 11

ट्रेलब्लेझर्स – स्मृती मंधाना (कप्तान), जेमिमा रॉड्रिग्स, पूनम यादव, हेली मॅथ्यूज, सोफिया डंकले, राजेश्वरी गायकवाड, अरुंधती रेड्डी, सलमा खातून, रेणुका सिंग, रिचा घोष (यष्टीरक्षक), शर्मीन अख्तर.

सुपरनोव्हास – डिआंड्रा डॉटिन, प्रिया पुनिया, सुन लुस, हरमनप्रीत कौर (कप्तान), हरलीन देओल, तानिया भाटिया (यष्टीरक्षक), सोफी एक्लेस्टोन, अलाना किंग, व्ही. चंदू, पूजा वस्त्राकर, मेघना सिंग.

महत्त्वाच्या बातम्या –

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!