आघाडीची स्मार्टफोन उत्पादक कंपनी Oppo ने नुकतेच भारतात आपले 2 स्मार्टफोन लाँच केले आहेत. यामध्ये Oppo A77s आणि Oppo A17 यांचा समावेश आहे. Oppo A77s मध्ये Snapdragon 680 प्रोसेसर देण्यात आला आहे तर Oppo A17 मध्ये MediaTek Helio G35 प्रोसेसर आहे. हे दोन्ही स्मार्टफोन बाजारात लाँच केले गेले असून विक्रीसाठी सुसज्ज आहे.
या स्मार्टफोन ची किंमत
आपल्या आधुनिक स्मार्ट फिचर्स नुसार या दोन्ही स्मार्टफोनच्या किमती आहे. Oppo A77s ची किंमत 17,999 रुपये आहे तर Oppo A17 ची किंमत आहे 12,499 रुपये आहे. हे दोन्ही स्मार्टफोन ऑनलाईन साइटवर (Flipkart/Amazon) आणि मोबाईल स्टोअर्समध्ये सुद्धा उपलब्ध आहे.
Oppo A77s चे फिचर्स
या स्मार्टफोन मध्ये 8GB RAM दिलेला असून 128GB इंटरनल स्टोरेज आहे. या स्मार्टफोन मध्ये 50MP ड्युअल कॅमेरा सेटअप आहे. आणि 8MP फ्रंट कॅमेरा आहे. या फोनच्या बॅटरी बद्दल सांगायचे झाले, तर यामध्ये 5000mAh ची बॅटरी आहे, जी 33W फास्ट चार्जरसह येते.
Oppo A17 चे फिचर्स
या स्मार्टफोनचा डिस्प्ले 6.56इंच एवढा असून यामध्ये 4GB RAM सोबत 64GB इंटरनल स्टोरेज आहे. हा स्मार्टफोन 50MP ड्युअल कॅमेरा सेटअपसह उपलब्ध आहे. आणि सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी या फोनमध्ये 5MP फ्रंट कॅमेरा उपलब्ध करून दिलेला आहे. या फोनच्या बॅटरी बद्दल सांगायचे झाले तर यामध्ये 5000mAh ची बॅटरी आहे.
महत्वाच्या बातम्या
- Ajit Pawar | अजित पवार कुणाचा दसरा मेळावा पाहणार? उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे?
- Job Alert | एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया मध्ये 156 पदांसाठी भरती
- मोठी बातमी : वंचित बहुजन आघाडीला खिंडार, ‘हा’ नेता करणार शिवसेनेत प्रवेश
- Maharashtra Rain Update | राज्यात सर्वत्र परतीच्या पावसाची धुमाकूळ
- Shivsena | निर्मला सीतारामन यांच्या ‘त्या’ वक्तव्यावर शिवसेनेचे प्रत्युत्तर, म्हणाले…
- NCP | ‘पवारांना तीन अंकी आमदार निवडून आणता आले नाहीत’ म्हणणाऱ्या पडळकरांना राष्ट्रवादीचं उत्तर म्हणाले…
- Vijay Shivtare | “NCP सोबत जाऊन उद्धव ठाकरेंनीच हिंदुत्त्वाची खरी तोतयेगिरी केली”


