Share

Ajit Pawar | अजित पवार कुणाचा दसरा मेळावा पाहणार? उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे?

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : दसरा मेळाव्यासाठी शिवसेना आणि शिंदे गटाची जोरदार तयारी सुरु आहे. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत मोठा बंड केल्यानंतर शिवसेना हस्तगत करण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत.  त्यामुळे परंपरेनुसार असलेला शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला देखील शिंदे गट दसरा मेळावा घेऊन शिवसेनेवर ताबा सांगणार आहेत. त्यामुळे दसऱ्याच्या दिवशी खरी राजकीय मेजवानी असणार आहे. या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार कुणाचा मेळावा पाहणार, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला.

अजित पवार म्हणाले, “दसरा मेळाव्याला दोघांचीही भाषणे एकाच वेळी सुरु झाली तर उद्धव ठाकरेंचे भाषण पहिल्यांदा ऐकू नंतर एकनाथ शिंदे यांचे भाषण पाहू. पुढे मागे झाले म्हणून बिघडलं कुठं. यापूर्वी देखील उद्धव ठाकरे यांचे भाषण संपल्यावर एकनाथ शिंदेंनी दिल्लीत प्रेस घेतली होती.”

दोन्ही गटांची जोरदार तयारी-

मुंबईत 5 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या दसरा मेळाव्यासाठी शिवसेनेच्या दोन्ही गटांनी जोरदार तयारी केली आहे. या मेळाव्यातून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गट आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट आपली ताकद दाखवण्याच्या तयारीत आहे.

शिंदे गटाचा सभेचा टीझर प्रसिद्ध-

शिंदे गटाने सभेचा टीझर प्रसिद्ध केला आहे. शिवरायांचा भगवा झेंडा, शिवसेनेचा भगवा, हिंदू धर्माचा भगवा झेंडा सर्वत्र फडकायला हवा, असे बाळासाहेब ठाकरे बोलताना ऐकायला मिळतात. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. ‘एक नेता, एक बाजू, एक विचार, एकलव्य, एकनाथ’ या घोषवाक्यासह छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ चित्रासह बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो, आनंद दिघे यांचा फोटो व स्वत: शिंदे यांचा फोटो या टीझरमध्ये दाखवण्यात आले आहे. टीझरमध्ये शिंदे यांनी स्वतःला एकलव्य म्हणून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.

उद्धव ठाकरे यांचे ट्वीट-

शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील मेळाव्याचा टीझर प्रसिद्ध केला आहे. एक नेता, एक झेंडा, एक मैदान… शिवसेनेच्या पारंपरिक ऐतिहासिक दसरा मेळाव्याचे साक्षीदार व्हा!, असे आवाहन शिवसेनेने केले आहे. वाजत गाजत, गुलाल उधळत या… पण शिस्तीत या!, असे उद्धव ठाकरे यांनी ट्वीटरवर म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!