मुंबई : राज्यातील वातावरण सध्या चांगलंच तापलं आहे. त्यामध्ये निवडणुकांचं वारंही घुमू लागलं आहे. तर दुसरीकडे जेव्हापासून एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत युती करून राज्यात सरकार स्थापन केलं, तेव्हापासून शिंदे गट आणि ठाकरे गट असे दोन गट पाहायला मिळत आहेत. या दोन्ही गटांमधले नेते एकमेकांवर सतत टीका करत असतात. अशातच शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांनी शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर हल्ला केला आहे.
काय म्हणाले विजय शिवतारे ?
राष्ट्रवादी, काँग्रेससोबत जाऊन उद्धव ठाकरे यांनीच हिंदुत्त्वाची खरी तोतयेगिरी केली, असा आरोप करत विजय शिवतारे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर चांगलाच निशाणा साधला आहे. शिवतारे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते.
पुढे विजय शिवतारे यांनी म्हटलं, उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली दिली आहे. तसेच, शिवतारे यांनी बाळासाहेबांच्या एका वक्तव्याची आठवण करून दिली.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी तेव्हा म्हटलं होतं की, कितीही वाईट परिस्थिती आली तरी मी राष्ट्रवादी, काँग्रेससोबत युती करणार नाही. वेळ पडली तर माझं दुकानं बंद करले. मात्र उद्धव ठाकरे यांनी त्याच काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत युती केली.
महत्वाच्या बातम्या :
- Vinayak Raut । “…म्हणून नारायण राणेंचं नाव कोबंडीचोर पडलं”; विनायक राऊतांचा टोला
- Shivsena | अंधेरी पूर्वची पोटनिवडणूक बिनविरोध करा, शिवसेनेची फडणवीसांकडे मागणी
- Amol Mitkari । पंकजा मुंडे यांचे राष्ट्रवादीत स्वागत आहे; अमोल मिटकरीची पुन्हा एकदा ऑफर
- Bhagat Singh Koshyari | राज्य माहिती आयोगाचा वार्षिक अहवाल राज्यपालांना सादर
- Shivsena । आधी 16 सदस्यांच्या अपात्रतेचा मुद्दा, नंतर चिन्हाची लढाई, अंबादास दानवेंनी स्पष्टचं सांगितलं


