Share

Shivsena | निर्मला सीतारामन यांच्या ‘त्या’ वक्तव्यावर शिवसेनेचे प्रत्युत्तर, म्हणाले…

Published On: 

मुंबई : वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेल्यापासून, राज्यातील राजकीय वातावरण खूपच गढूळ झालं आहे. अशातच देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन पुणे दौऱ्यावर असताना, त्यांना वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्पाबद्दल विचारण्यात आले. त्यावेळी याचे उत्तर विरोधकांनी द्यावे असं त्या म्हणाल्या. त्यांच्या या वक्तव्यावरून शिवसेना पक्षाने त्यांना प्रत्युत्तर दिले आहे.

शिवसेना पक्षाचा सीतारमन यांच्यावर हल्ला-

वेदांतासारखा महाराष्ट्राच्या हक्काचा प्रकल्प, त्यामुळे निर्माण होणारा लाखावर जनतेचा रोजगार एक झटक्यात हिरावला गेला. हे दुःखही महाराष्ट्राने व्यक्त करू नये का?  त्याचा जाबही केंद्र सरकारला विचारू नये का? तो विचारला तर त्यावरूनही केंद्रीय अर्थमंत्र्यांनी आगपाखड करायची, हा कुठला प्रकार आहे? सीतारामन यांनी वेदांतावरून विरोधकांना विचारणा करण्यापूर्वी तुम्हीच आधी काही प्रश्नांची उत्तरे द्या, असं म्हणत शिवसेनाच्या मुखपत्र सामना अग्रलेखातून सितारामन यांच्यावर निशाणा साधला आहे.

वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातमध्ये गेल्यावरून झालेल्या कोंडीने या सर्वच मंडळींच्या नाकातोंडात बरेच पाणी गेले आहे. त्यामुळे वेदान्तवरून समोरून प्रश्न आला की त्यांचा तिळपापड होतो.

वेदांता प्रकल्प गुजरातमध्ये जाणे हा त्यांच्यासाठी तोंड दाबून बुक्क्यांचा मार ठरला आहे. तोंड उघडता येत नाही आणि उघडावे तर आपलेच पितळ उघडे होणार, अशा कात्रीत सध्या भाजप आणि ‘मिंधे’ गटाचे लोक सापडले आहेत. त्यामुळे भलतेच कुठले तरी मुद्दे काढून विरोधक आणि टीकाकारांच्या नावाने बोटे मोडायची, असा प्रकार सुरू असल्याचंही अग्रलेखातून म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!