🕒 1 min read
एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया (AAI) मध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. पात्रधारकांकडून पदानुसार ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहे. यामध्ये ज्युनियर आणि सीनियर असिस्टंट पदांसाठी एकूण 156 जागा आहेत. यासाठी उमेदवार अधिकृत वेबसाईटला भेट देऊन अर्ज प्रकिया पूर्ण करू शकतात.
विविध पदांसाठी 156 जागा
नुकत्याच निघालेल्या एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाच्या जाहिरातीनुसार एएआय मध्ये 156 रिक्त पदांसाठी भरती सुरू करण्यात आली आहे. यामध्ये ज्युनियर असिस्टंट आणि सीनियर असिस्टंटच्या 156 जागा आहेत.
शैक्षणिक पात्रता
प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीनुसार, अर्ज करणारा उमेदवार 50 % गुणांसह 10 वी / 12 वी पास असावा किंवा मेकॅनिकल/ ऑटोमोबाईल / फायबरमध्ये तीन वर्षाचा डिप्लोमा पूर्ण झालेला असावा. उमेदवाराकडे व्हॅलिड ड्राइविंग लायसन असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 ते 30 वर्ष दरम्यान असावे.
सिलेक्शन प्रोसिजर
लेखी परीक्षा (CBT), PET, ड्रायव्हिंग टेस्ट, मेडिकल टेस्ट आणि डॉक्युमेंट वेरिफिकेशनच्या आधारावर उमेदवारांची निवड केली जाईल. लेखी परीक्षेमध्ये उमेदवारांना जनरल नॉलेज, जनरल इंटेलिजन्स, जनरल एज्युकेशन आणि इंग्रजी या विषयांचे प्रश्न विचारले जातील.
अर्ज फी
इच्छुक उमेदवारांना 1 हजार रु. फी भरावी लागेल. तर महिला आणि अनुसूचित जाती/जमाती प्रवर्गातील उमेदवारांना कोणत्याही प्रकारची फी भरावी लागणार नाही.
अर्ज कसा करायचा ?
एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाच्या अधिकृत वेबसाईट www.aai.aero ला जाऊन उमेदवार आज संध्याकाळपर्यंत अर्ज करू शकतात. अर्ज भरताना काही अडचण आल्यास 9513166392 या हेल्पलाइन नंबर वर फोन करून मदत मिळवू शकतात.
महत्वाच्या बातम्या
- मोठी बातमी : वंचित बहुजन आघाडीला खिंडार, ‘हा’ नेता करणार शिवसेनेत प्रवेश
- Maharashtra Rain Update | राज्यात सर्वत्र परतीच्या पावसाची धुमाकूळ
- Shivsena | निर्मला सीतारामन यांच्या ‘त्या’ वक्तव्यावर शिवसेनेचे प्रत्युत्तर, म्हणाले…
- NCP | ‘पवारांना तीन अंकी आमदार निवडून आणता आले नाहीत’ म्हणणाऱ्या पडळकरांना राष्ट्रवादीचं उत्तर म्हणाले…
- Vijay Shivtare | “NCP सोबत जाऊन उद्धव ठाकरेंनीच हिंदुत्त्वाची खरी तोतयेगिरी केली”
- Tanaji Sawant | ‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित’ अभियान दिवाळी पर्यंत राबविणार – तानाजी सावंत
- Nilesh Rane । “…तर ठाकरेंची अब्रु रस्त्यावर आणायला विनायक राऊत जबाबदार असतील”; निलेश राणेंचा पलटवार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
