🕒 1 min read
बीड : महाराष्ट्र राज्यामधील राजकीय वातावरण खूपच ढवळून निघालं आहे. त्यात सगळीकडे निवडणूकांचं वारंही घुमू लागलं आहे. आगामी निवडणुकांसाठी सर्व पक्ष तयारीला लागले असल्याचंही दिसून येतं आहे. या निवडणूकांच्या काळात खूप उलाढाली बघायला मिळतात. अशातच याचसंदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. वंचित बहुजन आघाडी पक्षाचा मोठा नेते शिवसेना पक्षात जाणार असल्याचं समजतं आहे.
वंचित बहुजन आघाडी पक्षाचे महत्त्वाचे नेते रविकांत राठोड वंचित बहुजन आघाडी पक्ष सोडून शिवसेना पक्षाचे शिवबंधन बांधणार आहेत. राठोड यांच्या या बातमीमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
रविकांत राठोड यांच्या पाठोपाठ मराठवाडा, खान्देश, विदर्भातील अनेक नेते शिवसेनेत प्रवेश करतील अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. त्याचबरोबर रविकांत राठोड शिवसेनेत प्रवेश करण्याचा सोहळा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत होणार आहे.
रविकांत राठोड यांनी शिवसेनेमध्ये जाण्याचा निर्णय घेतल्यामुळे वंचित बहुजन आघाडी पक्षाला मोठा धक्का बसला आहे. तसेच,विदर्भात बंजारा समाजाचे लोकप्रिय नेते शिंदे गटात गेल्याने शिवसेनेला मोठी चिंता होती. परंतू विकांत राठोड हे बंजारा समाजातील बडे नेते असल्यामुळे बंजारा मिळवणं शिवसेनेला सोप झालं आहे.
महत्वाच्या बातम्या :
- NCP | ‘पवारांना तीन अंकी आमदार निवडून आणता आले नाहीत’ म्हणणाऱ्या पडळकरांना राष्ट्रवादीचं उत्तर म्हणाले…
- Vijay Shivtare | “NCP सोबत जाऊन उद्धव ठाकरेंनीच हिंदुत्त्वाची खरी तोतयेगिरी केली”
- Tanaji Sawant | ‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित’ अभियान दिवाळी पर्यंत राबविणार – तानाजी सावंत
- Nilesh Rane । “…तर ठाकरेंची अब्रु रस्त्यावर आणायला विनायक राऊत जबाबदार असतील”; निलेश राणेंचा पलटवार
- Sanjay Rathod | अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड यांनी घेतला विभागाच्या कामाचा आढावा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
