Share

Maharashtra Rain Update | राज्यात सर्वत्र परतीच्या पावसाची धुमाकूळ

Published On: 

काल शुक्रवारी (दि. 29 सप्टेंबर) रोजी राज्यात अनेक ठिकाणी पावसाने अचानक विजांच्या कडकडाटांसह हजेरी लावली. अचानक आलेल्या या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. पुण्यासह राज्यात अनेक ठिकाणी पावसाने रस्ते जाम केले होते. त्यामुळे शहरी भागात वाहतूककोंडी निर्माण झाली होती. हवामान खात्याकडून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कारण येणाऱ्या 4 दिवसांत मध्यम सरी बरसण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

राज्यात परतीच्या पावसाला सुरुवात

राज्यातून 5 ते 10 ऑक्टोबर दरम्यान परतीच्या पावसाचा प्रवास सुरू होण्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे. तर याचवेळी मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र सहित अनेक ठिकाणी जोरदार पावसाची सुरू आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

हवामान खात्याचे माजी अधिकारी यांनी माहिती दिली आहे की, राज्यात पुढील 4 दिवस कोकण, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्याचबरोबर नंदुरबार, धुळे, जळगाव, औरंगाबाद, अहमदनगर, नाशिक, ठाणे,चंद्रपूर, यवतमाळ, नांदेड, गडचिरोली, या जिल्ह्यांमध्ये देखील हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

राज्यातील या भागांमध्ये येल्लो अलर्ट जारी

मराठवाड्यातील औरंगाबाद,जालना,बीड, उस्मानाबाद, परभणी, नांदेड लातूर आणि हिंगोली या भागांत मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर मध्य महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे,जळगाव,नाशिक आणि नगर या परिसरांमध्ये देखील पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!