Share

‘दीड वर्षात १० लाख नोकऱ्या देणार’ ; नरेंद्र मोदींचे आश्वासन!

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली :  केंद्रातील मोदी सरकार आगामी काळात रोजगार निर्मितीवर आपलं विशेष भर देणार आहे. रोजगार निर्मिती यावर केंद्र सरकार लक्ष केंद्रीत करणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वतः याबाबत महतवाचे निर्देश दिले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, येत्या दीड वर्षांमध्ये साधारण १० लाख नोकरभरती केली जावी. यामुळे आता अनेकांना सरकारच्या विविध विभागांमध्ये आणि मंत्रालयामध्ये काम मिळणार आहे.

पीएमओ कार्यालयाकडून एक ट्वीट करण्यात आलं आहे. या ट्विटमध्ये ही घोषणा करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व विभाग आणि मंत्रालयांमधील मानव संसाधन स्थितीचा आढावा घेतला आणि सरकारने पुढील १.५ वर्षांत मिशन मोडमध्ये १० लाख लोकांची भरती करावी, असे निर्देश दिले, असं या ट्विटमध्ये म्हंटले आहे.

बेरोजगारीच्या मुद्द्यावरुन मोदी सरकारवर सातत्याने टीका केली जाते. विरोधी पक्ष सातत्याने मोदी सरकारवर टीका करत असतात. राहुल गांधी यांच्यासह इतर पक्षाचे नेतेही मोदींवर हल्लाबोल करत असतात. ट्वीटरवर रणदीप सुरजेवाला यांनी यावर आपली प्रतिक्रिया नोंदवत मोदी सरकारवर टीका केली आहे. याला म्हणतात ९०० चुहे खाकर बिल्ली हज को चली. मागील ५० वर्षांच्या हिशोब घेतल्यास बेरोजगारीचा दर वाढला आहे. रुपयाची किंमत ७५ वर्षांत घसरली आहे आणि इथे पंतप्रधान ट्विटर ट्विटर खेळून महत्त्वाच्या मुद्द्यांवरुन लक्ष भरकटवण्याचे काम करत आहेत, असं सुरजेवाला यांनी सांगितलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!