मुंबई : आयपीएलमधील राजस्थान रॉयल्स संघाचा फलंदाज रियान पराग प्रचंड चर्चेत राहिला होता. आयपीएल २०२२ च्या हंगामादरम्यान त्याला अनेकदा टीकेला सामोरे जावे लागले होते. त्याची खराब कामगिरी आणि मैदानावरील त्याचे वर्तन कायम प्रश्नांच्या भोवऱ्यात राहिले होते. या युवा फलंदाजाने राजस्थान रॉयल्ससाठी १७ सामन्यांमध्ये १ अर्धशतकाच्या जोरावर १८३ धावा केल्या होत्या. रियानला खूप कमी वेळा फलंदाजी करायची संधी मिळाली. तो फलंदाजीस ६ आणि ७ व्या क्रमांकावर फलंदाजी करायचा. त्यामुळे त्याला मैदानात येताच मोठे फटके खेळावे लागत असत. कमी चेंडू खेळल्याचा पश्चाताप होत नाही, पण या भूमिकेत चांगली कामगिरी करायची आहे, असे रियान म्हणाला. परागला आशा आहे की तो देखील एमएस धोनीप्रमाणे ६ आणि ७ व्या स्थानावर आपले वर्चस्व बनवू शकेल. एमएस धोनीने आपल्या कारकिर्दीत भारत आणि आयपीएलमध्ये फिनिशरची भूमिका बजावली होती. धोनी जगातील सर्वोत्तम फिनिशरपैकी एक मानला जातो. त्याप्रमाणे परागचीही इच्छा आहे की त्याने या भूमिकेत चांगली कामगिरी करावी.
एमएस धोनीच्या मार्गावर जायचे आहे
स्पोर्ट्स तकशी संवाद साधताना रियान पराग म्हणाला की, ‘मी आयपीएल मधील क्रिकेट आणि इतर क्रिकेट मधूनही खूप शिकत आहे. कोणत्याही फलंदाजांसाठी ६ आणि ७ क्रमांकावर खेळणे सोपे नाही. लोकांना वाटते की तुम्ही येऊन काही टेन्शन न घेता फक्त षटकार मारावे. पण ते सोपे कार्य असते असे मुळीच नाही. मी काही चांगल्या खेळी खेळल्या आणि मी नक्कीच यापेक्षा चांगली खेळी करू शकलो असतो. पण मी म्हटल्याप्रमाणे, खूप काही शिकण्यासारखे आहे. मी ज्या स्थानावर फलंदाजी करतो त्यावर मी आनंदी आहे. मी माझ्या कामगिरीवर फारसा खूश नाही पण मला वाटते की मी माझ्या फलंदाजीच्या स्थानावर चांगली कामगिरी करेल. मला सहाव्या आणि सातव्या क्रमांकावर वर्चस्व गाजवायचे आहे. जागतिक क्रिकेटमध्ये फक्त एकाच खेळाडूने हे केले आहे आणि तो म्हणजे एमएस धोनी. त्यांच्याशिवाय इतर कोणाच्याही खेळाडूंचं नाव मनात येत नाही. मी त्या मार्गाने जाण्याचा प्रयत्न करत आहे. जो काही अनुभव घेता येईल तो घेईन आणि पुढच्या वर्षी त्याचा उपयोग करू शकेन.’ याव्यतिरिक्त पराग असेही म्हणाला की, ‘भारतीय संघाच्या बोलावण्यावर माझे मुळीच लक्ष नाही. तो त्याचा भारतीय संघात खेळण्याचा नंबर येईपर्यंत वाट पाहिल. आणि सध्या खेळत असलेल्या क्रिकेटवर लक्ष देत संघासाठी चांगल्या खेळी करेल.’
आयपीएलच्या यंदाच्या हंगामात परागला अनेक वेळा टीकेला सामोरे जावे लागले आहे. परागच्या क्षेत्ररक्षणादरम्यान मैदानावरील वर्तनावर अनेक माजी खेळाडूंनी नाराजी व्यक्त केली होती. त्याचबरोबर परागच्या फलंदाजीवरही काहींनी प्रश्न उपस्थित केले होते. अनेक माजी खेळाडूंनी परागला इतर गोष्टींवर लक्ष देण्यापेक्षा आपल्या खेळावरती लक्ष देण्याचेही सुचवले होते. तर काहींनी परागला यादरम्यान पाठिंबा दिल्याचेही पाहायला मिळाले होते.
महत्वाच्या बातम्या:


