Share

शिवसेना व भाजपमध्ये वाद पेटण्याची शक्यता, देवेंद्र फडणवीस यांना निमंत्रित करण्याचा आग्रह 

Published On: 

मुंबई: गुरुवारी, १६ जून रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे किंवा पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते बोरीवली येथील उड्डाण पुलाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. बोरिवली येथील एस. व्ही. रोडवरील कोरा केंद्र उड्डाणपुलाचे रखडलेले काम पूर्ण झाले आहे. दरम्यान या कार्यक्रमास विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनाही निमंत्रित करावे असा आग्रह भाजपने केला आहे. मात्र याला शिवसेनेने विरोध केला असल्याने भाजप व शिवसेना यांच्यात वाद पेटण्याची शक्यता आहे.

उड्डाणपुलाच्या कामाला नोव्हेंबर २०१८ मध्ये सुरुवात झाली होती. हे काम २४ महिन्यांत पूर्ण करण्याचे नियोजन असल्याने नोव्हेंबर २०२०मध्ये या पुलावरून वाहतूक सुरू व्हायला हवी होती. मात्र करोना आणि कामे वाढल्यामुळे पुलाचे काम रखडले होते, आता पुलाचे काम पूर्ण झाले असून मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन व्हावे, अशी इच्छा या भागातील शिवसैनिकांनी व्यक्त केली आहे. मात्र मुख्यमंत्र्यांची तारीख निश्चित होत नसल्याने उद्घाटन रखडले असताना पाहायला मिळत आहे.

दरम्यान, या पुलाच्या उद्घाटन कार्यक्रमाला देवेंद्र फडणवीस यांनाही निमंत्रण द्यावे, असा आग्रह भाजपने धरला आहे. खासदार गोपाळ शेट्टी यांनी या पुलाचा प्रस्ताव पालिकेत मांडला होता. तसेच “राजशिष्टाचारानुसार विरोधी पक्षनेत्यांना आमंत्रित करावे”, अशी मागणी भाजपचे उत्तर मुंबई जिल्हाध्यक्ष गणेश खणकर यांनी आयुक्तांकडे पत्राद्वारे केली आहे.

महत्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!