Share

राज ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त लावण्यात आलेले बॅनर फाडले, नवीन वाद पेटण्याची शक्यता

Published On: 

ठाणे : आज १४ जून रोजी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा वाढदिवस. यानिमित्त कालपासूनच कार्यकर्त्यांच्या भेटी गाठी सुरु झाल्या होत्या, तसेच मनसे कार्यकर्त्यांकडून देखील आपापल्या भागात बॅनर्स लावून राज ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या जात आहेत. ठाण्यातील मुंब्रा परिसरातही शुभेच्छा बॅनर लावण्यात आलेले. मात्र काल (१३ जून) रोजी रात्रीच बॅनर फाडल्याची घटना घडली आहे. या पाश्वर्भूमीवरून मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले असल्याचे पाहायला मिळत आहे.

राज ठाकरे यांनी ठाण्यात घेतलेल्या जाहीर सभेत मशिदींवरील भोंग्यांना विरोध केला होता. तसंच या मशिदींसमोर हनुमान चालीसा तितक्याच मोठ्या आवाजात लावण्याचे आवाहनही कार्यकर्त्यांना केले होते. त्यानंतर मुंब्र्यातील वातावरण तापले होते आणि या परिसरातील मनसे पदधिकारी इरफान सय्यद यांच्या कार्यालयावर दगडफेक करण्यात आली होती. यांनतर राज ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी इरफान सय्यद यांच्याकडून मुंब्रा परिसरात बॅनर्स लावण्यात आले होते. बॅनर्स फाडण्यात आल्याने पुन्हा नवा वाद निर्माण झाला आहे.

पक्षातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना इरफान सय्यद यांनी या प्रकाराची माहिती दिली आहे. तसेच या प्रकरणी इरफान सय्यद हे मुंब्रा पोलीस ठाण्यात तक्रार देणार आहेत अशी चर्चा होत आहे. त्यामुळे पोलीस बॅनर फाडणाऱ्या व्यक्तींविरोधात नक्की काय कारवाई करतात हे पाहावे लागेल.

महत्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!